नदीत बुडालेल्या ‘त्या’ तरुणांचा शोध घेण्यासाठी नदीत सोडले कॅमेरे, एक मृतदेह ट्रेस करण्यास यश

चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीत पोहायला गेलेल्या दहा मुलांपैकी दोन मुलं पाण्यात बुडाली. कालपासून नदीत मृतदेहांचा शोध घेण्यास अपयश येत होते. आज कॅमेऱ्याच्या मदतीने एकाच शोध घेण्यास यश आले आहे.

नदीत बुडालेल्या 'त्या' तरुणांचा शोध घेण्यासाठी नदीत सोडले कॅमेरे, एक मृतदेह ट्रेस करण्यास यश
बुडालेल्या एकाचा मृतदेह ट्रेस करण्यास यशImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 10:04 AM

चिपळूण : चिपळूणमधील वशिष्ठी नदीत पोहताना बुडालेल्या दोघांपैकी एकाला ट्रेस करण्यास रेस्क्यू टीमला यश आले आहे. पाण्यात कॅमेरे सोडून एकाला ट्रेस केले आहे. खोल पाण्यात दगडाखाली मृतदेह अडकला आहे. मृतदेह बाहेर काढण्यास अडचणी येत आहेत. रेस्क्यू टीमकडून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. दुसऱ्या तरुणाचा अद्याप शोध सुरु आहे. महाड येथील प्रशांत साळुंखे यांच्या रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरु आहे. इतर आठ जण सुखरुप आहेत. बचावलेले सर्वजण आठवीचे विद्यार्थी आहेत. सुट्टीच्या नदीवर अंघोळीचा आनंद लुटणे चांगलेच महागात पडले आहेत. नदीवर अंघोळ करत फोटोग्राफी करत होते. या घनटेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

सुट्टी असल्याने नदीवर पोहायला गेले होते

रविवारी सुट्टी असल्याने 10 जण शिरगाव येथे वशिष्ठी नदीत पोहायला गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोन जण बुडाले. दोघेही दहावीचे विद्यार्थी होते. घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मुलांचा शोध सुरु केला. मात्र त्यांचा काहीच पत्ता लागत नव्हता. यामुळे महाड येथील प्रशांत साळुंखे यांच्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले.

नदीत कॅमेरा सोडून एक मृतदेह ट्रेस करण्यास यश

दिवसभर शोध घेतल्यानंतरही रेस्क्यू टीमला मृतदेह हाती लागले नाही. स्थानिकांनी रात्रीच्या वेळीही शोधमोहिम सुरुच ठेवली होती. मात्र पाण्याचा वाढता प्रवाह आणि पाण्याची खोली यामुळे मृतदेह शोधण्यास अपयश आले. अखेर आज सकाळी रेस्क्यू टीमने कॅमेऱ्याच्या मदतीने एकाचा शोध घेण्यास यश मिळवले. नदीच्या पाण्यात कॅमेरे सोडून शोध घेतला असता एका मुलाचा मृतदेह शोधण्यात आला आहे. दुसऱ्या मृतदेहाचा अद्याप शोध सुरु आहे. ट्रेस केलेला मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.