नितीन देसाई यांच्या चुलत भावांनी जागवल्या आठवणी; म्हणाले, गावाची नाळ कधी तुटू दिली नाही

| Updated on: Aug 02, 2023 | 9:32 PM

माणूस कितीही मोठा झाला तरी मूळ गावाची आठवण येतेच. सिनेसृष्टीतलं नितीन देसाई हे मोठं नाव. पण त्यांनी आपल्या गावाजवळ असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही.

नितीन देसाई यांच्या चुलत भावांनी जागवल्या आठवणी; म्हणाले, गावाची नाळ कधी तुटू दिली नाही
Follow us on

रत्नागिरी : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अकाली जाण्यानं सिनेसृष्टीत हळहळ माजली. नितीन देसाई यांनी स्वतःला का संपवलं हे शोधणं सुरू आहे. स्वतःला संपवलं तत्पूर्वी त्यांनी ऑडिओ रेकॉर्डिंग केलं होतं. तसेच धनुष्यबाणाचं चिन्ह रेखाटलं होतं. आपल्या एन. टी. स्टुडियोतचं नितीन देसाई यांनी जीवनयात्रा संपवली. एक चिठ्ठी सापडली असून, अंत्यसंस्कार एन. डी. स्टुडिओतच करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

नितीन देसाई यांनी १८० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. व्याजासह रक्कम २४९ कोटींपर्यंत पोहचली. कर्जवसुलीसाठी एडलवाईज कंपनीनं जिल्हाधिकाऱ्यांना एक प्रस्ताव दिला. देसाईंनी तारण ठेवलेली जमीन आणि मालमत्ता जप्त करून कर्जवसुली करण्याचा तो प्रस्ताव होता. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून स्वतःला संपवलं असावं, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो.

YouTube video player

गणपतीला गावात येत असत

माणूस कितीही मोठा झाला तरी मूळ गावाची आठवण येतेच. सिनेसृष्टीतलं नितीन देसाई हे मोठं नाव. पण त्यांनी आपल्या गावाजवळ असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही. गावच्या प्रत्येक घडामोडीत प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असे. गणपती आणि शिमगोत्सव हे त्यांच्या जिव्हाळ्याचे सण होते. ते कुठेही असले तर ते गावात गणपतीला येत असत. इतकेच नाही त्या वेळेला ते प्रत्येक गावात घरी भजनासाठी त्यांना जसा वेळ असेल तसा ते देत असत. प्रत्येक घरी जाऊन भजनासाठी बसत असत.

सोनाली कुलकर्णी यांना गावात आमंत्रित केलं होतं

मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम त्यांनी गावात केला होता. त्यांच्या राहत्या घरापासून ते अगदी गावदेवी मंदिरापर्यंत म्हणजे जवळजवळ तो एक ते दीड किलोमीटरचा रस्ता आहे. डोंगर खोऱ्यातून ते पायी चालत जायचे. हे त्यांच्याबद्दल ही एक खूपच मोठी आठवण ठेवण्यासारखी आहे. गावात बांधलेल्या मारुती मंदिराचं ज्या वेळेला उद्घाटन झालं त्यावेळेला त्यांनी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनाही आपल्या गावी कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. त्या आल्या होत्या. त्यांच्या जाण्याने आमच्या गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या सगळ्या आठवणी सांगताना संजय साळवी आणि ग्रामस्थांचा कंठ दाटून आला.