तळीये दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जागा ठरली, नातेवाईकांना तातडीने 2-2 लाखाची मदत
तळीयेतील दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठीची जागा निश्चित करण्यात आली आहे. (Rehabilitation Of The taliye Villagers soon, administration fixed land)
महाड: तळीयेतील दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठीची जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच दुर्घटनाग्रस्तांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात येत आहे. (Rehabilitation Of The taliye Villagers soon, administration fixed land)
तळीयेचे कोतवाल बाळा कोंढाळकर यांनी या बाबतची माहिती दिली. तळीये गावातील दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन होणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करम्यात आली आहे. जागा मालकानं त्याबाबतची संमती दिली की या दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार आहे. गावातीलच सर्व्हे नंबर 125-15 गट ही जागा निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती कोंढाळकर यांनी दिली आहे.
दोन दिवसात कृषी पंचनामे
तळीयेतील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकार प्रत्येकी दोन लाखांची मदत देण्यात येत आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे पीक विमा योजनेतून ही मदत देण्यात येत आहे. मृत शेतकऱ्यांचे सातबारे गोळा करण्यात आले आहेत. येत्या आठवड्यात कागदपत्रे सादर करण्यात येणार आहेत. दोन दिवसात कृषी पंचनामे होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांनना आणखी दोन लाखांची मदत देण्यात येणार आहे, असं मंडल कृषी अधिकारी भाऊसाहेब गावडे यांनी सांगितलं. दरम्यान, तळीयेला राज्यातून मदतीचा ओघ येत आहे. तसेच हे दुर्घटनाग्रस्त गाव पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत आहे. राज्याच्या विविध भागातून लोक येत आहेत.
नेमकं काय घडलं?
गेल्या आठवड्यात महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला.नदरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली होती. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत होते. (Rehabilitation Of The taliye Villagers soon, administration fixed land)
VIDEO | 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 30 July 2021 https://t.co/g8b2cBouKi #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2021
संबंधित बातम्या:
Maharashtra Rain Landslides LIVE | सांगलीकरांनो आणखी पाणी पातळी वाढणार, 10 हजार लोक स्थलांतर
(Rehabilitation Of The taliye Villagers soon, administration fixed land)