धाराशिवमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना, मजुरांचा करण्यात आला अमानवीय छळ
रत जाऊ नये म्हणून त्यांना गुलामासारखी वागणूक दिली जात असल्याची बाब समोर आली. पीडित मजुरांनी याची तक्रार केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
धाराशिव : धाराशिवमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही बातमी आहे. विहीर कामासाठी कुशल मजूर लागतात. मोजकेच लोकं अशी काम करतात. अशा कुशल मजुरांकडून काम करून घेतले जात असे. पण, ते परत जाऊ नये म्हणून त्यांना गुलामासारखी वागणूक दिली जात असल्याची बाब समोर आली. पीडित मजुरांनी याची तक्रार केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर समाजातून मनस्ताप व्यक्त केला जात आहे. माणूस माणसाला अशी वागणूक कशी देऊ शकतो. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या चौघांचा भंडाफोड झाला आहे. या मजुरांची सुटका झाल्याने
मजुरांना साखळीदंडाने बांधले जायचे
बळजबरीने विहीर कामासाठी आणून गुलाम बनवून ठेवलेल्या ११ मजुरांची सुटका करण्यात आली. मजूर पळून जाऊ नये म्हणून त्यांना साखळदंडाने बांधले जायचे. ढोकी आणि शिराढोन हद्दीतून ११ मजुरांची सुटका केली. 4 जणांना ढोकी पोलिसानी ताब्यात घेतले. औरंगाबाद, वाशिम, जालना, हिंगोली, नांदेड, बुलढाणा आणि मध्यप्रदेश येथील ११ मजुरांचा यात समावेश होता. गुत्तेदार कृष्णा बाळू शिंदे, संतोष शिवाजी जाधव आणि इतर दोघे हे मजुरांना मारहाण करत. बळजबरीने विहीर काम करून घेत असल्याची माहिती मजुरांनी दिली.
११ मजुरांचा सुटका
विहीर कामासाठी बळजबरीने आणून गुलाम बनवून ठेवलेल्या ११ मजुरांची ढोकी पोलिसांकडून सुटका करण्यात आलीय. हे मजूर पळून जाऊ नये म्हणून त्यांना साखळदंडाने बांधण्यात येत होते. वाखरवाडी आणि खामसवाडी येथून या ११ मजुरांची सुटका करण्यात आली आहे.
या चार आरोपींना अटक
हे मजूर औरंगाबाद, वाशिम, जालना, हिंगोली, नांदेड, बुलढाणा आणि मध्यप्रदेश येथील आहेत. गुत्तेदार कृष्णा बाळू शिंदे, संतोष शिवाजी जाधव आणि इतर दोन जण मारहाण करत होते. बळजबरीने विहीर काम करून घेत असल्याचं मजुरांनी सांगितले आहे. याप्रकरणी ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी या प्रकरणात ४ आरोपींना अटक केली आहे.