Amravati Riots : महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं काहींचं कारस्थान, बळी पडू नका, शांतता पाळा; नवाब मलिक यांचं आवाहन

महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं काहींचं कारस्थान आहे. त्याला बळी पडू नका. शांतता पाळा. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

Amravati Riots : महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं काहींचं कारस्थान, बळी पडू नका, शांतता पाळा; नवाब मलिक यांचं आवाहन
nawab malik
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 12:31 PM

मुंबई: महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं काहींचं कारस्थान आहे. त्याला बळी पडू नका. शांतता पाळा. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या राज्यात शांतता कशी राहिल यावर भर द्या, असं आवाहन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे.

त्रिपुराच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत प्रचंड हिंसाचार झाला. भाजपने आज अमरावती बंदची हाक दिली आहे. मात्र, या बंदलाही हिंसक वळण लागलं आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना नागरिकांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे. आंदोलन करणं हा तुमचा अधिकार आहे. पण त्याला हिंसक वळण लागू देता कामा नये. हिंसक आंदोलनाला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. अमरावती, नांदेड मालेगाव या ठिकाणी लोकांनी शांतता ठेवली पाहिजे. पोलीस कायदा सुव्यवस्था राखतील. नागरिकांनीही हिंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी. शांतता ठेवावी. माथी भडकविणाऱ्यांचं ऐकू नका. राज्यात शांती भंग करण्यासाठी अनेक लोक कारस्थान करत आहेत. त्याला बळी न पडता शांतता राखा, असं आवाहन मलिक यांनी केलं.

रिझवींवर कारवाई करा

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या निषेधार्थ देशात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्रातही बंद पुकारला गेला. देशातील सलोखा कसा बिघडेल याबाबत वारंवार प्रयत्न सुरू आहेत. पुस्तकं लिहिली जात आहेत. विधानं केली जात आहेत. लोकांची भावना दुखावण्याचं काम सुरू आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. नियोजित पद्धतीने देशातील वातावरण कसं बिघडेल हे वसीम रिझवींच्या माध्यमातून सुरू आहे. रिझवी शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन होते. तिथे त्यांनी अफरातफर केली. त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशात तक्रार दाखल झाली. शिया कम्युनिटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं. पण सीबीआयने यात कोणतीही कारवाई केली नाही. कोल्ड स्टोरेजमध्ये हे प्रकरण ठेवण्यात आलं आहे. या वसीम रिझवींना मोकळीक देण्यात आली असून त्यामुळे वातावरण बिघडत आहे. रिझवींवर कारवाई करावी. भविष्यात कोणतेही विधानं किंवा लिखानातून देशातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी मलिक यांनी केली.

अमरावती पुन्हा पेटले

दरम्यान, आज सलग दुसऱ्या दिवशी अमरावती पेटले. अमरावतीत सकाळपासूनच जमावाकडून जोरदार दगडफेक सुरू आहे. अमरावतीत राजकमल चौकात तोंडाला रुमाल लावून आलेल्या काही आंदोलकांनी हातात विटा घेऊन दुकानांच्या दिशेने फेकल्या. तर काही तरुणांनी दगडांनी दुकाने फोडले. काही तरुणांनी तर थेट रुग्णालयाला लक्ष्य केलं. या तरुणांनी रुग्णालयाच्या दिशेने दगडफेक केली. पोलिसांनी या जमावाला पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला असता जमावासोबत पोलिसांची बाचबाची झाली. त्यामुळे पोलिसांना काही लाठीमार करावा लागला. मात्र, जमाव प्रचंड असल्याने त्यांना नियंत्रित करणं अशक्य होत होतं. शिवाय पोलिसांची कुमकही कमी असल्याने जमावाला पांगवताना पोलिसांची दमछाक होत होती.

संबंधित बातम्या:

शिवसेनेने कधीही ठरवून मुस्लिमांना विरोध केला नाही, आमच्या हिंदुत्वाच्या व्याखेत सर्व जातीधर्मांना स्थान: संजय राऊत

रजा अकादमीवर बंदी घाला, नाही तर आम्ही त्यांना संपवू, महाराष्ट्रातल्या दंगलीवर राणेंचा इशारा

Video: शिवसेनेचे खोतकर म्हणाले, इन्शा अल्लाह हम तुम्हारे साथ है, भाषणाने जमाव भडकला? भरसभेतला तो व्हिडीओ चर्चेत

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.