“सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी दंगली घडवतं”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं दंगलींचं राजकारण सांगितलं

सध्या राज्यातील सामाजिक परिस्थिती योग्यरित्या हातळण्याची गरज असून यामध्ये होणारे राजकीय हस्तक्षेप टाळले गेले पाहिजेत असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी दंगली घडवतं; राष्ट्रवादीच्या नेत्यानं दंगलींचं राजकारण सांगितलं
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 4:23 PM

सांगली : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काही कारणास्तव दंगली घडल्या आहेत. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात घडलेल्या घटनांवरून विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांवरच ठपका ठेवला आहे. त्यामुळे आता या दंगली राज्यकर्ते घडवत आहेत का असा सवाल आता नागरिकांसह राजकीय नेत्यांनीही सत्ताधाऱ्यांवर ठपका ठेवत आता गंभीर आरोपही केले आहेत. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे.

आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर टीका करताना राज्यात घडणाऱ्या दंगलीमुळे समाजातील सामाजिक सलोखा बिघडत चालत आहे. यामुळे सामाजिक परिस्थित गंभीर रुप धारण कर असून या सगळ्या गोष्टींना कारणीभूत सरकार असल्याचा गंभीर आरोपही जंयत पाटील यांनी केला आहे.

कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि राज्यातील इतर ठिकाणी दंगली घडत असताना त्यावर पोलिसांनी आणि प्रशासनाने नियंत्रण मिळवले असले तरी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सध्या वाईट आहे. राज्यात सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी या दंगली घडवत आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी विरोधकांवर केला आहे.

ज्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे तिथे दंगली घडवल्या जात आहेत असा गंभीर आरोपही जयंत पाटील यानी केला आहे.

आज सांगलीत जयंत पाटील यांनी पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांची भेट घेत कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याबाबत निवेदन सादर केले.

सध्या राज्यातील सामाजिक परिस्थिती योग्यरित्या हातळण्याची गरज असून यामध्ये होणारे राजकीय हस्तक्षेप टाळले गेले पाहिजेत असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.