Gadchiroli Rain : गडचिरोलीत पावसाळ्यात रस्ता दुरुस्तीचे काम, पुरात रस्ता गेला वाहून, 35 गावांतील लोकांचा संपर्क तुटला
भामरागड तालुक्यात प्रत्येक वर्षी सर्वात आधी पावसाळ्यात तालुक्याचा संपर्क तुटत असतो. मागील वर्षी पावसाळ्यात चार महिन्यांत नऊ वेळा भामरागड तालुक्याच्या संपर्क पूर्णपणे जिल्ह्यापासून तुटला होता. आता पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच तालुक्याच्या व जवळपास 35 गावाच्या संपर्क पूर्णपणे जिल्ह्यापासून तुटलेला आहे.
गडचिरोली : भामरागड तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाच्या फटक्यामुळे कुमरगुडा व हेमलकसाजवळील दोन पुलांवर एक ते दीड फूट पाणी वाहत आहे. त्यामुळं तालुक्याच्या संपर्क ( Contact) जिल्ह्यापासून तुटलेला आहे. कुमरगुडा या रस्त्यावर पावसाळ्याच्या वेळी कंत्राटदाराने खोदकाम (Excavation) केले. रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केल्यामुळे सुरू असलेला रस्ता पूर्णपणे बंद झाला. भामरागड (Bhamragad) तालुक्यातील जवळपास 35 गावांच्या वाहतूक या भामरागड-नारायणपूर राष्ट्रीय महामार्गावरून चालते. भामरागड-नारायणपूर छत्तीसगढ-महाराष्ट्र मालेगाव महामार्ग पूर्णपणे बंद आहे. त्यामुळं या मार्गातून असे भानगड तालुक्यातील व 35 गावांतील लोक प्रवास करीत असतात. प्रवासासाठी मोठी अडचण या नागरिकांना आज सकाळपासून होत आहे.
विद्यार्थी, व्यापाऱ्यांचा प्रवास खोळंबला
भामरागड तालुक्यात प्रत्येक वर्षी सर्वात आधी पावसाळ्यात तालुक्याचा संपर्क तुटत असतो. मागील वर्षी पावसाळ्यात चार महिन्यांत नऊ वेळा भामरागड तालुक्याच्या संपर्क पूर्णपणे जिल्ह्यापासून तुटला होता. आता पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच तालुक्याच्या व जवळपास 35 गावाच्या संपर्क पूर्णपणे जिल्ह्यापासून तुटलेला आहे. हा एकच मार्ग जिल्ह्यापासून संपर्कात असल्यामुळे या मार्गातून असे 35 गावांचे नागरिक शाळकरी विद्यार्थी व व्यापारी प्रवास करीत असतात.
दोन दिवसांच्या मुसळधार पावसात रस्ता गेला वाहून
भामरागड तालुक्यातील कुभरगुडा या गावात कंत्राटदाराने पावसाळ्यात वेळेस रस्त्याचे काम सुरू केले. रस्त्यावर खोदकाम केल्याने कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. हा कच्चा रस्ता दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला. भामरागडच्या तहसीलदार व मुख्याधिकारी हे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून रस्ता सुरू करण्याचे प्रयत्न करीत आहेत.
चंद्रपुरातल्या कोसरसार गावात शिरले पाणी
चंद्रपुरातही सततच्या पावसाने गावालगतच्या नाल्याला पूर आला. वर्धा नदीत जाणारा नाला अवरुद्ध झाल्याने कोसरसार गावात पाणी शिरले. जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात संततधार संकट ठरली. कोसरसार गावातील ग्रामपंचायत-आठवडी बाजार आणि स्मशानभूमी पाण्याखाली आली. वारंवार निवेदने देऊनही नाल्याचे खोलीकरण झाले नाही. त्यामुळं गावातल्या सखल भागात पुराचे पाणी शिरले. तहसील प्रशासनाने घटनेची दखल घेत पथक रवाना केले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाच्या दमदार हजेरीने पाणीच पाणी झाले आहे.