सचिनला जुनाबाई वाघिणीने भुरळ, पत्नीसह ताडोबात दाखल, सफारीत काय-काय बघीतलं

एका जिल्हा परिषदेच्या शाळेत भेट दिली. त्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्स देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन सचिन यांनी यावेळी पूर्ण केलं.

सचिनला जुनाबाई वाघिणीने भुरळ, पत्नीसह ताडोबात दाखल, सफारीत काय-काय बघीतलं
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 11:58 AM

नीलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : सचिन तेंडुलकर यांचं वेगळं वलय आहे. वाघाला पाहण्यासाठी ते ताडोब्यात हमखास येतात. येथील वाघ पाहण्यासाठी येण्याची त्यांची ही पाचवी वेळ आहे. विशेष म्हणजे मागच्या वेळी ताडोबा परिसरातील गावाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी एका जिल्हा परिषदेच्या शाळेत भेट दिली. त्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्स देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन सचिन यांनी यावेळी पूर्ण केलं.

क्रिकेटचा देव, भारतरत्न सचिन तेंडुलकर पाचव्यांदा सपत्निक जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाला आहे. मागील खेपेस त्यांनी आपल्या राहत्या रिसॉर्ट शेजारी असलेल्या अलिझंजा या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार त्यांनी या शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना स्कूलबॅग वितरित केल्या.

हे सुद्धा वाचा

कोलारा गेटवरून केली ताडोबात सफारी

सचिनला ताडोबातील जुनाबाई वाघिणीने भुरळ घातली. तो तिच्या दर्शनासाठी पुन्हा एकदा ताडोबात दाखल झालाय. त्यांनी कोलारा प्रवेशद्वारावरून ताडोबात सफारी केली. त्यादरम्यान त्यांना छोटी तारा वाघीण, अस्वल आणि रानगवे यांचे दर्शन झाल्याचे माहिती आहे. यादरम्यान ताडोबातील वन्य प्राणी विश्व व इथल्या सुविधांबाबत सचिन आणि पत्नी अंजली यांनी आनंद व्यक्त केला.

सचिन यांनी स्वतः दिल्या बॅग्स

सचिन तेंडुलकर यांचे औक्षण केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना सचिन म्हणाले, माझा तुमच्या अभ्यासक्रमात धडा आहे, असं मला सांगितलं होतं. यावेळी मी तुमच्यासाठी स्कूल बॅग्स आणि त्यात काही शैक्षणिक साहित्य आहे ते आणले. खूप अभ्यास करा, असं सचिन यांनी यावेळी मुलांशी बोलताना सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतः सचिन यांनी बॅग्स वितरित केल्या.

sachin 2 n

शाळेतील विद्यार्थी खूश

विद्यार्थिनी श्रृती मेश्राम म्हणाली, सचिन तेंडुलकर यांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. मी खेळ शिकल्यावर खूप आनंद झाला. सचिन रमेश तेंडुलकर हे सर आहेत. ते आम्हाला भेटतील असं वाटलं नव्हतं. अभ्यासक्रमात त्यांचा धडा शिकला. ते स्वतः शाळेत आल्याने आम्ही खूप आनंदित आहोत.

विद्यार्थी हा क्षण कधीही विसरणार नाही

शिक्षिका मनीषा बावणकर यांनी सांगितलं की, सचिन तेंडुलकर यांनी शाळेत भेट दिली. मुलं त्यांना भेटण्यासाठी आतुर झाले होते. मुलांची इच्छा होती की, या मोठ्या खेळाडूला भेट देतील. नेमका तो क्षण आला. मुलं हा क्षण कधीही विसरू शकणार नाही. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पोरांचा आनंद द्विगुणित केले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.