पळून आलेले आमदार काय म्हणतात, संदिपान भुमरेंनी स्पष्टचं सांगितलं
माझ्यासमोर नितीन देशमुख हे शिंदे यांना म्हणाले, साहेब मी तुमच्या सोबत आहे. आपल्याला उद्धव ठाकरे यांना खुर्चीवरून खाली खेचायचंच आहे. या घटनेचा मी साक्षीदार असल्याचं संदिपान भुमरे यांनी सांगितलं.
गणेश सोनोने, टीव्ही ९, अकोला : गुवाहाटी येथून पळून आलेले आमदार नितीन देशमुख चक्क खोटे बोलत आहेत. असा आरोप राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी केला आहे.महाविकास आघाडीचे सरकार कशाप्रकारे पाडण्यात आलं. उद्धव ठाकरेंच्या कामांमुळ सर्व नेते मंत्री नाराज होते. त्यामुळेच निर्णय घ्यावा लागला. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख सांगतात, की मी तिथून पळून आलो. वाटेत मला देव भेटला. पण सर्रास हे चुकीचं आहे. मी त्याचा साक्षीदार आहे, असं राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी म्हटलंय.
खुर्ची पाडावीच लागेल
नितीन देशमुख म्हणत होते की, उद्धव ठाकरे यांची खुर्ची पाडल्या गेलीच पाहिजे. शिंदे साहेब मी तुमच्यासोबत आहे. शेवटपर्यंत तुमची साथ सोडणार नाही. उद्धव साहेब यांची खुर्ची पाळावीच लागेल. असा शब्द आमदार नितीन देशमुख यांचा होता.
शिंदे गटाचा हिंदू गर्वगर्जना मेळावा
याचे साक्षीदार अब्दुल सत्तार आणि मी खुद्द संदिपान भुमरे आहोत. हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांना काय झालं. हे समजलं नाही, यासह अनेक गोष्टींचा त्यांनी खुलासा केला. आज राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे हे अकोल्यात आयोजित शिंदे गटाच्या हिंदू गर्वगर्जना मेळाव्यात बोलत होते.
मी कॅबिनेट मंत्री असताना शिंदे साहेबांसोबत गेलो. अशी ही देशातील पहिली घटना आहे. मी स्वतः शिंदे यांच्या गाडीत होतो. अब्दुल सत्तार सोबत होते. नितीन देशमुख हेही शिंदे यांच्यासोबत होते. त्यावेळी गाडीत असताना ठाण्यातून सूरतला पोहचलो.
तेव्हा माझ्यासमोर नितीन देशमुख हे शिंदे यांना म्हणाले, साहेब मी तुमच्या सोबत आहे. आपल्याला उद्धव ठाकरे यांना खुर्चीवरून खाली खेचायचंच आहे. या घटनेचा मी साक्षीदार असल्याचं संदिपान भुमरे यांनी सांगितलं.