Sangli District Bank Elections | सांगली जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता, मंत्री विश्वजित कदम यांचे मावस भाऊ पराभूत

Sangli District Bank Election Result 2021 | सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत (Sangli District Bank Election) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने 17 जागा मिळवत सत्ता काबीज केली आहे. तर जिल्ह्यात चार भाजपचे (BJP) उमेदवार निवडून आले आहेत.

Sangli District Bank Elections | सांगली जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता, मंत्री विश्वजित कदम यांचे मावस भाऊ पराभूत
Sangli district bank election
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 2:16 PM

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत (Sangli District Bank Election) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने 17 जागा मिळवत सत्ता काबीज केली आहे. तर जिल्ह्यात चार भाजपचे (BJP) उमेदवार निवडून आले आहेत. तर, जतमध्ये धक्कादायक निकाल लागला आहे. मंत्री विश्वजित कदम (Vishwajit Kadam) यांचे मावस भाऊ आमदार विक्रम सावंत (MLA Vikram Sawant) हे पराभूत झाले आहेत.

मंत्री विश्वजित कदम यांचे मावस भाऊ पराभूत

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल हाती आले आहेत. जत सोसायटी गटात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून मंत्री विश्वजित कदम यांचे मावस भाऊ विद्यमान संचालक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत पराभूत झाले आहेत. त्यांचे विरोधक असलेल्या भाजपच्या प्रकाश जमदाडे यांना 45 मतं मिळाली तर विक्रम सावंत यांना 40 मत मिळाली आहेत. विशेष म्हणजे सावंत हे राज्याचे मंत्री विश्वजीत कदम यांचे मावस भाऊ आहेत.

जिल्हा बँकेसाठी 85.31 टक्के इतके मतदान झाले होते. बँकेच्या संस्था आणि व्यक्तिगत अशा एकूण 2573 पैकी 2195 मतदारांनी हक्क बजावला होता. बँकेच्या 21 जागांपैकी तीन जागा बिनविरोध झाल्यामुळे 18 जागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या विद्यमान संचालकांसह 46 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. आज या बंद पेट्या उघडल्यानंतर महाविकास आघाडीने तब्बल 17 जागांवर विजय मिळवला आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकमध्ये महाविकास आघाडीने सहकार पॅनेलच्या माध्यमातून 17 जागा मिळवून बँकेवर सत्ता स्थापन केली आहे. या एकूण 21 जागांमध्ये राष्ट्रवादी 9, काॅंग्रेस 5, शिवसेना 3 आणि भाजप 4 जागांवर विजयी झाले आहेत.

महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलला – 17 जागा

तर भाजपच्या शेतकरी पॅनेलला  – 4 जागा मिळाल्या

एकुण 21 जागांमध्ये राष्ट्रवादी 9, काॅंग्रेस 5, शिवसेना 3 आणि भाजप 4 जागांवर विजयी

संबंधित बातम्या :

VIDEO: शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर शिंदे समर्थक भडकले, थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच दगडफेक

MLC election : काँग्रेसकडून विधान परिषदेच्या ‘या’ दोन जागांसाठी उमेदवार जाहीर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.