खासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

महापालिका क्षेत्रातल्या खासगी कोविड हॉस्पिटल मधील डेथ ऑडिटची सीआयडीमार्फत चौकशी करावी,अशी मागणी संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

खासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा
corona virus
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 11:58 PM

सांगली: महापालिका क्षेत्रातल्या खासगी कोविड हॉस्पिटल मधील डेथ ऑडिटची सीआयडीमार्फत चौकशी करावी,अशी मागणी संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.तसेच याबाबत प्रशासनाकडून पाऊले उचलली गेली नाही,तर उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा संघटनेचे नेते डॉ. महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे. (Sangli Dr.Maheshkumar Kamble demanded CID enquiry of corona deaths in private hospitals)

कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा प्रश्न ऐरणीवर

87 रुग्णांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मिरजेतील अ‌ॅपेक्स केअर हॉस्पिटलच्या डॉ. महेश जाधव याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.या मुद्द्यावरून सांगली महापालिका क्षेत्रातल्या खाजगी रुग्णालयात झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत संघर्ष सफाई कर्मचारी व असंघटित कर्मचारी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. महेश कुमार कांबळे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांना महापालिका क्षेत्रातल्या सर्व खाजगी रुग्णालयात झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.

उच्च न्यायालयात याचिका करण्याचा इशारा

15 जुलैपर्यंत ज्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे, त्या ठिकाणाचे डेथ ऑडिट करून त्यांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे. तसेच प्रशासनाकडून याबाबत जर कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही तर आपण उच्च न्यायालयामध्ये या सर्व प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी मागणी करण्यासाठी याचिका दाखल करणार असल्याचा इशारा याप्रसंगी डॉ. महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे शरद सातपुते व पदाधिकारी उपस्थित होते.

पुण्याकडे पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या डॉक्टरला अटक

डॉ.महेश जाधव याच्या रुग्णालयात कोरोना नियमावलीप्रमाणे उपचार करण्यात आले नाही. कोणत्याही प्रकारचे व्हेंटिलेटरची आणि अद्यावत अशी सुविधा उपलब्ध नसताना देखील अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले. याशिवाय शिकाऊ डॉक्टरांच्या निगराणीखाली हे सगळे उपचार करण्यात येत होते. त्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली. त्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी डॉक्टर महेश जाधव यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्याकडे पसार होणार्‍या डॉ.महेश जाधव याला कासेगाव याठिकाणी ताब्यात घेऊन 18 जून रोजी अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

87 कोरोनाबाधितांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अ‍ॅपेक्स हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टराला बेड्या

Corona Vaccination | उद्यापासून 18 वर्षांवरील सर्वांचं सरसकट लसीकरण, राजेश टोपेंची माहिती

(Sangli Dr.Maheshkumar Kamble demanded CID enquiry of corona deaths in private hospitals)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.