सांगली: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतल्या झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही शर्यत होऊ नये यासाठी पोलिसांकडून शेतकऱ्यांची धरपकड सुरु करण्यात आली होतं. तीन शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सुप्रीम कोर्टात विषय प्रलंबित असल्यानं शर्यत होऊ नये यासाठी प्रशासन कामाला लागलंय. तर, दुसरीकडे सांगलीच्या इस्लामपूर वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील सोन्या हा मोठा बैल हा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आटपाडी झरे येथील बैलगाडी शर्यती साठी रवाना झाला आहे.
झरे आटपाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीला महाराष्ट्रात गाजलेला वाटेगाव ता.वाळवा येथील मोठा सोन्या बैल घेऊन जाताना शेतकरी दिसत आहेत. हा मोठा सोन्या बैल शर्यती साठी रवाना झाला आहे. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेली बैलगाडाी शर्यत राज्यात चर्चेचा विषय ठरलेला आहे.
एकीकडे पोलिसांकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय. मला जेलमध्ये टाकलं तरी बैलगाडा शर्यत होणार. राष्ट्रवादी काँग्रेसचं गृहमंत्रालय बळाचा वापर करत आहे. आमच्या शेतकऱ्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात झाली आहे. काय कारवाई व्हायची ती होऊ द्या. मी बैलगाडा शर्यत भरवणारच, असा पवित्रा पडळकर यांनी घेतला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.
पडळकर यांनी येत्या 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या बैलगडा शर्यतीसाठी पडळकर यांनी लाखो रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास कायद्यानुसार बंदी आहे. ही बंदी उठवण्याची मागणी राज्यातील काही संघटना तसेच पक्षांनी केली आहे. या मुद्द्याला घेऊन अनेक ठिकाणी आंदोलनदेखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बैलडागा शर्यतीसाठी पडळकरसुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे या गावात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. या शर्यतीत प्रथम येणाऱ्यास त्यांनी 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलंय. द्वितीय तसेच तृतीय आणि चौथा क्रमांक पटकावणाऱ्यांनाही वेगवेगळे बक्षीस देण्यात येणार आहे.
इतर बातम्या:
बैलगाडा शर्यत होणारच, गोपीचंद पडळकर यांचा इशारा
Sangli Islampur Sonya bull and Farmers went to Zare for bullock cart race