सांगली : कोरोनाची तिसरी लाट ओसरत असली तरी अजूनही धोका टळलेला नाही. महाराष्ट्राच्या काही भागात अजूनही कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. असे असताना सांगलीचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी (Digvijay Suryawanshi) यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यामुळे त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. सध्या ते गृहविलगीकरणात असून उपाचार घेत आहेत. (Sangli Mayor Digvijay Suryawanshi tested Corona positive)
मागील काही दिवसांपसून सांगलीचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. संशय बळावल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली. यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ते लगेच गृहविलगीकरणात गेले असून उपचार घेत आहेत. यावेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच नागरिकांनीही कोरोना त्रिसूत्रीचं पालन करावे अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली असली तरी पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अजूनही लक्षणीय आहे. सांगली जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. येथे रोज हजारच्या घरात नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. तसेच शेकडो म्युकरमायकोसिसचे नवे रुग्ण आढळत आहेत. सांगली शहरातसुद्धा कोरोनाचा फैलाव रोखण्यात अजूनतरी यश आलेलं नाही.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता सांगली तसेच वाळवे तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहून कोरोना नियमाचे पालन करावे असे आवाहन पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येथील नागरिकांना यापूर्वी केले.
इतर बातम्या :
नवऱ्यासोबत घटस्फोट, आता कुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे मिनिषा लांबा? बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा
(Sangli Mayor Digvijay Suryawanshi tested Corona positive)