फाईली खेचल्या, फाडण्याचा प्रयत्न, सांगलीत अजित पवार गट आणि भाजपचे नगरसेवक आमनेसामने

सांगलीत महापालिकेच्या मासिक सभेत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नगरसेवकात जोरदार वाद झाला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या हातातील फाईली भाजपा नगरसेवकाने हिसकावत फाडण्याचा प्रयत्न केला.

फाईली खेचल्या, फाडण्याचा प्रयत्न, सांगलीत अजित पवार गट आणि भाजपचे नगरसेवक आमनेसामने
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 4:56 PM

सांगली | 20 जुलै 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आणखी 8 बड्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याशिवाय सर्व मंत्र्यांसाठी खातेवाटपदेखील करण्यात आलं आहे. आता सरकारमध्ये भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटदेखील सहभागी झाला आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 पेक्षा जास्त आमदारांनी पाठिंबा दिला आहे. अजित पवार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. आता सरकारमध्ये तीन मित्र पक्ष आहेत. पण सांगलीत वेगळाच प्रकार बघायला मिळाला. सत्ताधारी मित्र पक्षातील दोन नगरसेवकांमध्येच जोरदार राडा झाला. त्यामुळे या प्रकरणाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

सांगली महापालिकेच्या मासिक सभेत भाजपा आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नगरसेवकामध्ये जोरदार वादावादी झाली. हा वाद इतका शिगेला गेला की माजी महापौर आणि भाजप नगरसेवक विवेक कांबळे यांनी राष्ट्रवादी नगरसेवकाच्या हातातील फाईल फाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

नेमकं काय घडलं?

अजित पवार गटाचे राष्ट्रवादी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या हातातील फाईल विवेक कांबळे यांनी हिसकावून घेत त्या फाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचा प्रकारही घडला. मात्र अन्य नगरसेवकांनी मध्यस्थी करत दोघानाही शांत केले. या घटनेमुळे महासभेत काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक योगेंद्र थोरात हे विकास कामांच्या फाईली घेऊन फिरतात. यावर भाजप नगरसेवक विवेक कांबळे यांनी आक्षेप घेतला. त्यांनी थोरात हे शासकीय फाईली घेऊन फिरण्याबाबत आक्षेप व्यक्त केला. यामुळे वाद आणखीन उसळला. यामध्ये थोरात यांच्या हातातील फाईली हिसकावून घेत विवेक कांबळे यांनी फाडण्याचा प्रयत्न केला.

अजित पवार काय प्रतिक्रिया देणार?

संबंधित घटनेवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे सत्तेत दोन विरोधी बाकांवरचे पक्ष आता मित्र बनले असले तरी स्थानिक पातळीवर जे प्रकार घडतात त्याकडे दुर्लक्ष करुनही चालणार नाही. संबंधित प्रकरण मिटवणं किंवा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मनधरणी करणं जास्त महत्त्वाचं आहे. अन्यथा पुढे जावून एक लहान गोष्ट एखाद्या पक्षासाठी मोठी अडचणीची ठरु शकते. त्यामुळे संबंधित प्रकरणी नगरसेवकांना आपल्या वरिष्ठ नेत्यांकडून कशाप्रकारे मार्गदर्शन करण्यात येतं ते देखील महत्त्वाचं आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.