Gautam Patil | गौतमी पाटील हिचा पाय घसरला, भर मंचावर डान्स करत असताना अचानक…, पाहा VIDEO

सांगली जिल्ह्यातील पलूसमध्ये पृथ्वी-संग्राम युथ फाउंडेशनची दहीहंडी आयोजित करण्यात आली होती. यावेळी गौतमी पाटील हिच्या नृत्याने दहीहंडी उत्सवात रंगत भरली होती. पण गौतमी नाचत असताना अचानक एक अनपेक्षित घटना घडली.

Gautam Patil | गौतमी पाटील हिचा पाय घसरला, भर मंचावर डान्स करत असताना अचानक..., पाहा VIDEO
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 3:15 PM

सांगली | 11 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्रातील सध्याच्या घडीतील आघाडीची आणि लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती चर्चेत येण्यामागील कारण थोडसं वेगळं आहे. गौतमी पाटील स्टेजवर आपला जोरदार परर्फारन्स करत होती. यावेळी तिचा पाय घसरला. त्यामुळे ती मंचावर पडली. पण त्यानंतरही तिने हार मानली नाही. ती पुन्हा जागेवरुन उठली आणि पुन्हा नाचू लागली. तिच्या या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गौतमी नृत्य करत असताना स्टेजवर अचानक पडल्याने तिच्या चाहत्यांना या घटनेचं वाईट वाटलंय. पण त्यांच्याकडून गौतमीचं कौतुक होतंय.

आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली किंवा कोणताही प्रसंग आला तर अपयश मानायचं नाही. निराश होऊन काम करणं सोडून द्यायचं नाही तर पुन्हा त्याच जोमाने उभं राहायचं आणि कामाला लागायचं. हाच आदर्श गौतमीने आपल्या या कृतीतून दाखवून दिला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांकडून तिचं कौतुक होत आहे.

नेमकं काय घडलं?

पलूसमध्ये पृथ्वी-संग्राम युथ फाउंडेशनकडून भव्य दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. या दहीहंडी उत्सवाला गौतमी पाटीलच्या नृत्याने उत्सवात रंगत भरली. यावेळी गौतमी नाचत असताना तिचा पाय घसरला. त्यामुळे तिचा स्टेजवर तोल गेला. मात्र तिने लगेच स्वतःला सावरले आणि पुन्हा डान्स सुरू केला. यावेळी काही क्षणासाठी प्रेक्षकांमध्ये देखील धडकी भरली होती. पण तिने स्वत:ला सावरत पुन्हा नृत्य सुरु केल्याने प्रेक्षकांनीही जल्लोष सुरु केला.

या मानाच्या दहीहंडीसाठी 1 लाख 55 हजार 555 रुपये इतके बक्षीस होते. तसेच सलामी देणाऱ्या प्रत्येक संघास 25 हजाराचे बक्षीस पृथ्वी-संग्राम युथ फाउंडेशनकडून देण्यात आले. सांगली , कोल्हापूर, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून जवळपास 7 संघ या दहीहंडी उत्सवास उपस्थित राहिले होते.

पलूसमधील पैलवान रोहित पाटील यांनी भव्य अशा या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. या दहीहंडी उत्सवाला हजारो तरुणांनी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. यावेळी या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षण राहिलेल्या गौतमी पाटीलनी आपल्या नृत्याने या दहीहंडी उत्सवात रंगत भरली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.