या मंत्र्यांनी आधी ढोल वाजवला, नंतर ऑटो चालवला; रिक्षा चालकांसोबतचा आनंद कशासाठी?
बरेच वर्षे प्रलंबित मागणी पूर्ण झाली. त्यामुळे लिंगायत, वडर, रामोशी गुरव समाज तसेच रिक्षा चालकांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगली : खांद्यावर घोंगडे घेऊन ढोल वाजवून पालकमंत्र्यांनी धनगर समाजासोबत जल्लोश साजरा केला. शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात लिंगायत समाज, रामोशी समाज, गुरव समाज, वडार समाज ऑटो रिक्षा चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन केले. त्याबद्दल पालकमंत्र्यांचा जोरदार सत्कार करण्यात आला. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी स्वतः रिक्षा चालवत रिक्षा चालकांसोबत आनंद आणि जल्लोश साजरा केला. शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात लिंगायत समाज, रामोशी समाज, गुरव समाज, वडार समाज ऑटो रिक्षा चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन केले. बरेच वर्षे प्रलंबित मागणी पूर्ण झाली. त्यामुळे लिंगायत, वडर, रामोशी गुरव समाज तसेच रिक्षा चालकांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रिक्षा चालकांच्या आनंदात सहभागी
आज पालकमत्र्यांचे मिरजेत आगमन झाले. लिंगायत , रामोशी, वडर समाज आणि रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत धनगरी ढोल वाजवून रॅली काढण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे आणि त्यांचे सुपुत्र सुशांत खाडे यांनी खांद्यावर घोंगडे घेतली. ढोल वाजवून आनंदात शमील झाले होते. तसेच पालकमंत्री सुरेश खाडे यांनी अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. आज रिक्षा चालकांच्या आनंदात सहभागी झाले. रिक्षात बसून पालकमंत्र्यानी स्वतः रिक्षा चालवत प्रवास केला.
पालकमंत्री सुरेश खाडे यांनी महात्मा बसवेश्वर पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी भाजप पक्षाचे नगरसेवक मिरज विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी रामोशी, लिंगायत, वडर समाजाचे तसेच रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहुसंख्य समाजाची मागणी झाल्याने हा आनंद साजरा करत असल्याचं पालकमंत्री तथा कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी म्हंटलं.