सांगली : अज्ञात कारणावरुन एका पोलीस हवालदारा (Police Constable)ने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना आज सकाळी सांगलीत घडली आहे. रामचंद्र बिरणगे (46) असं पोलिस हवालदाराचे नाव आहे. रामचंद्र बिरणगे हे सांगली शहर पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते. याबाबत अद्याप पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नाही. बिरणगे यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचा तपास पोलिस करीत आहेत. सांगली विश्रामबाग पोलीस लाईन येथे ते कुटुंबासोबत राहत होते. बिरणगे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा, एक मुलगी आहे. बिरणगे यांची पत्नी गृहिणी आहे तर दोन्ही मुलं महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Sangli police constable committed suicide by strangulation for unknown reasons)
चार दिवसापूर्वी बिरणगे यांच्या घरी चोरी झाली होती. याबाबत बिरणगे यांच्या पत्नी आरती बिरणगे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. आरती यांनी या चोरी प्रकरणी सुजाता तानाजी हेगडे या संशयित महिलेविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार सुजाता हेगडे या महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर रामचंद्र बिरणगे यांनी गुरुवारी मध्यरात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत अद्याप पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नाही. (Sangli police constable committed suicide by strangulation for unknown reasons)
इतर बातम्या
UP : महिलांवरती बलात्कार करण्याची उघडपणे धमकी, व्हिडीओच्या आधारे महंतांवर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल