सांगली : परवानगी नसतानादेखील बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यासह इतर 41 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय (Sangli police file case against BJP MLC Gopichand Padalkar who organised bullock cart race)
बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी या मागणीला घेऊन भाजप आमदार गोपीचंद पडळकर काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. त्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे गावात भव्य अशी बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. काहीही झाले तरी शर्यत घेणारच असा निश्चय पडळकर यांनी केला होता. नंतर पडळकर समर्थकांनी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास एका मैदानात धावपट्टी तयार केली आणि पुढच्या काही तासांत तिथे स्पर्धा भरवली. या प्रकारानंतर आता सांगलीतील प्रशासनाने कायदेशीर कारवाई केली आहे. पडळकर यांच्यावर जिल्हाधिकारी तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. पडळकर तसेच इतर 41 जणांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदा जमाव जमविणे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणे, कोरोनाकाळात आपत्ती व्यवस्थापनाचा नियम भंग करणे तसेच प्राणीजीवन कायद्या अंतर्गतसुद्धा सांगलीतील आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून बैलगाडा शर्यतीच्या आयोजनावरुन मोठं राजकारण रंगलेलं होतं. बंदी असली तरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणारच, अशी आक्रमक भूमिका पडळकर यांनी मांडली होती. तर आम्ही परवानगी देणार नाही, अर्थात शर्यत पार पडणार नाही, अशी भूमिका पोलिस-प्रशासनाने घेतली होती. त्यामुळे पडळकर समर्थकांची बैलगाडा शर्यत पार पडणार की नाही, याची राज्यभरात मोठी उत्सुकता होती. मात्र, पडळकर समर्थकांनी स्पर्धेचं यशस्वीपणे आयोजन केलं. स्पर्धेनंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला होता.
इतर बातम्या :
IAS Transfer : निधी चौधरींची मुंबईच्या आयटी संचालकपदी नियुक्ती, रायगडचे नवे जिल्हाधिकारी कोण?
कपिल पाटलांच्या जन-आशीर्वाद यात्रेची सांगता; नवी मुंबईत यात्रेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल
(Sangli police file case against BJP MLC Gopichand Padalkar who organised bullock cart race)