एक फोन आला, बापाची नजर हटली, तीन मुलं वाहून गेली, ‘लुशी’चं काय झालं? सांगली हादरली

ही ह्रदयद्रावक बातमी सांगलीतून (Sangli Three Brothers Drown). आटपाडी तालुक्यात घाणंद नावाचं गाव आहे. याच गावात तीन भावंडं कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडलीय.

एक फोन आला, बापाची नजर हटली, तीन मुलं वाहून गेली, 'लुशी'चं काय झालं? सांगली हादरली
Sangli Brothers Drown
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 9:16 AM

सांगली : ही ह्रदयद्रावक बातमी सांगलीतून (Sangli Three Brothers Drown). आटपाडी तालुक्यात घाणंद नावाचं गाव आहे. याच गावात तीन भावंडं कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडलीय. यात दोन सख्खे भाऊ तर एक चुलत भाऊ आहे. विशेष म्हणजे ही तीनही भावंडं कालव्यावर मासेमारीसाठी गेली होती. त्यातच ती वाहून गेली. काळीज पिळवटून टाकणाऱ्या ह्या घटनेत कुत्रंही वाहून गेलं. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सापडला आहे. तीन भावंडांपैकी एकाच मृतदेह आता सकाळी सापडला आहे. दोन सख्ख्या भावंडांचा मात्र शोध सुरु आहे (Sangli Three Brothers Drown In Runnel One Dead Body Found Search Operation Started).

तीनही भावंडं वाहून गेल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ही शोध मोहिम सुरु होती पण फार काही हाताला लागलं नाही. आनंदा अकुंश व्हनमाने, विजय अंकुश व्हनमाने हे दोन सख्खी भावंडं असून त्यांचं प्रत्येकी वय 14 आणि 17 वर्षे आहे. तर वैभव लहू व्हनमाने हा 14 वर्षांचा असून तो चुलत भाऊ आहे.

एक फोन आला आणि…

टेंभू योजनेचे पाणी घाणंद तलावात सोडण्यात आलं आहे. तलाव भरुन सांडव्यावरुन पाणी वेगानं वाहतं आहे. बाहेर पडलेलं पाणी कालव्यातून आटपाडीकडे येते. इथंच अंकुश व्हनमाने आणि लहू व्हनमाने ह्या दोन सख्ख्या भावांची शेतजमीन आहे. काल दुपारी तीन वाजता मासेमारीसाठी लहू व्हनमाने हे स्वत:चा मुलगा वैभव आणि भावाची दोन मुलं आनंद, विजय यांना घेऊन शेताकडे आले. सोबत त्यांचं पाळीव कुत्रंही त्याचं नाव लुशी होतं. बंधाऱ्यावर गेल्यानंतर लहू व्हनमाने यांना फोन आला आणि मुलांना तिथंच सोडून ते निघून गेले. परत आले तर मुलं जाग्यावर नव्हती. त्यांनी स्वत:च काही वेळ शोधा शोध केली पण ना तीन मुलं सापडली ना कुत्रं लुशी.

तीन मुलांसाठी शोध मोहीम

सायंकाळ झाली तरी मुलं मिळाली नाहीत. मग कुटंबिय आणि शेजाऱ्यांनी शोधा शोध सुरु केली. शेवटी रात्री आठ वाजता घाणंद तलावातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या कालव्याजवळ विजय आणि आनंदा यांचे कपडे, चप्पला सापडल्या. वैभवचं मात्र काहीच सापडलं नाही. विशेष म्हणजे कुत्र्याचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात सापडला. घटनास्थळावरच बकेट, त्याला बांधलेली दोरीही सापडली. त्यावरुनच काही तरी दुर्घटना घडल्याचा अंदाज बांधला जातो आहे.

पुन्हा सकाळी शोधा शोध

पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे तीनही मुलांचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही. गावकऱ्यांनी, कुटुंबियांनी शोधण्यासाठी भरपूर मेहनत घेतली पण हाती काही लागलं नाही. दरम्यान पोलीस पाटील नंदिनी जुगदर, अनिता पाटील यांनी आटपाडी पोलीस आणि महसूल प्रशासनाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर तहसिलदार सचिन मुळीक, पोलीस निरीक्षिक भानुदास निंभोरे घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनानं मग सांगली आणि भिलवडीहून पाणबुडे बोलवले. त्यांनीही अंधारात मुलांचा शोध घेतला पण त्यांनाही काही सापडलं नाही. रात्री शोध मोहिम थांबवली. सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरु केली तेव्हा दोन अडीच तासातच वैभव लहू व्हनमाने या मुलाचा मृतदेह सापडला.

‘लुशी’चा मृत्यू कसा झाला?

पाण्याच्या प्रवाहात तीन भावंडं वाहून गेली पण सोबत कुत्र्याचा कसा मृत्यू झाला हे अजूनही गुढ आहे. त्या कुत्र्याचं नाव लुशी होतं आणि तो अल्सेशियन जातीचा होता. तीनही भावंडं एकदाच वाहून गेली की, एकाला दुसरा वाचवताना तिघेही पाठोपाठ गेली हे अजूनही समजलेलं नाही. बरं तीनही भावंडं एकमेकांना वाचवत असताना लुशीही त्यांना वाचवण्यासाठी आत गेला का? की लुशी पाण्यात गेला आणि त्याला वाचवताना भावंडाचा जीव गेला असे अनेक तर्कवितर्क लावले जातायत.

Sangli Three Brothers Drown In Runnel One Dead Body Found Search Operation Started

संबंधित बातम्या :

कुत्रं धुण्याच्या नादात तीन भावंडं वाहून गेली, तिघांचाही शोध सुरु, कुत्र्याचा मृतदेह सापडला

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.