Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधानांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली, तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का? संजय गायकवाड यांचा वारकऱ्यांना सवाल

शिवसेनेचे बुलडाणा मतदार संघातील आमदार संजय गायकवाड यांनी काही वारकऱ्यांसोबत झालेल्या मांसाहाराच्या वादात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

पंतप्रधानांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली, तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का? संजय गायकवाड यांचा वारकऱ्यांना सवाल
आमदार संजय गायकवाड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 10:15 PM

बुलडाणा : शिवसेनेचे बुलडाणा मतदार संघातील आमदार संजय गायकवाड यांनी काही वारकऱ्यांसोबत झालेल्या मांसाहाराच्या वादात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. पंतप्रधानांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का? असा सवाल गायकवाड यांनी वारकऱ्यांना केलाय. संजय गायकवाड यांनी कोरोनापासून संरक्षणासाठी मांसाहार करण्याचा सल्ला दिला. यानंतर काही वारकऱ्यांनी यावर आक्षेप घेतला होता. मात्र, गायकवाड आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय (Sanjay Gaikwad say Narendra Modi eat biryani in Pakistan while commenting on Non veg eating).

“शाळेतील मुलांना शाळेत वसतिगृहात,सैनिकांना अंडी, मटण, चिकण दिलं जातं”

बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, “आपल्या समर्थकांना कोरोनाशी झुंज देताना किमान अंडी आणि चिकन मटण खावं असं आवाहन केले होतं. यातून जीव वाचवण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता प्रोटीन मिळेल असं ते म्हणाले होते. त्यानंतर काही लोकांनी ते आवाहन स्वतःच्या अंगावर घेऊन माझ्यावर टीका टिप्पणी सुरू केली. आज शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीमध्ये अंडे खायला दिल्या जातात. वसतिगृहात एक-दोन दिवस आड मुलांना मटण-चिकन शासनाच्या सक्तीने दिले जातात. सैन्याला देखील दोन वेळा नॉनव्हेज दिलं जातंय. यामुळे त्यांच्यामध्ये शत्रूंशी लढण्याची ताकद यायला पाहिजे. यामुळेच फौजींमध्ये कोरोनाचं प्रमाण नसल्यासारखं आहे.

“जे 70-80 टक्के रुटिंगमध्ये नॉनव्हेज खातात त्यांचा कुठला धर्म भ्रष्ट झालाय?”

“मुस्लीम समाजामध्ये सुद्धा कोरोनानं मृत्यूचं प्रमाण नसल्यासारखा आहे. कारण त्यांचा जेवण प्रोटीनयुक्त आहे. म्हणून आपल्या लोकांनी तसं जेवण केलं तर कदाचित त्यांच्यातही प्रमाण कमी होईल. याच्यामध्ये माझं चुकलं कुठं? असं बोलल्यामुळे हिंदू समाजाची भावना दुखावली गेलीय तर आज जे 70-80 टक्के रुटिंगमध्ये नॉनव्हेज खातात त्यांचा कुठला धर्म भ्रष्ट झालाय? त्यांना तुम्ही धर्माच्या बाहेर हाकललं नाही, की त्यांना धर्मात ठेवणार नाही?” असा सवाल त्यांनी केला. काही विशिष्ट सेलच्या लोकांनी आपल्या अंगावर ओढण्याचा जो काही प्रयत्न सुरू केलाय त्या विधानावर आजही मी ठाम असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.

हेही वाचा :

Audio Clip : ‘तुमच्या xxx का मिरच्या लागल्या?’ निषेध व्यक्त करणाऱ्या अजून एका महाराजांना शिवसेना आमदाराने झापलं

Audio Clip: तुमच्या महाराज लोकांनी मंडपातून बायका पळवून नेल्या..सेना आमदारानं तथाकथित महाराजाला सुनावलं

Audio: जगला तर धर्म नाही तर गेला गधीच्याxxx, फोन करणाऱ्या महाराजाला सेना आमदारानं झापलं

व्हिडीओ पाहा :

Sanjay Gaikwad say Narendra Modi eat biryani in Pakistan while commenting on Non veg eating

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.