संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची ‘गौतमी पाटील’; कुणी केली ही टीका?

उद्धव ठाकरे नेमके लंडनला चाललेत की लंडन व्हाया स्वित्झर्लंडला चाललेत. काळा पैसा ठेवायला चाललेत का? त्यांनी लवकर जावं. परत आल्यावर किती आमदार तुमच्या सोबत असतील याचा अनुभव घ्यावा.

संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची 'गौतमी पाटील'; कुणी केली ही टीका?
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 11:41 AM

सिंधुदुर्ग : संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहेत. तिला बघायला लोकांना जसं आवडतं, तसं आपल्यालाही बघायला लोक चॅनल सुरू करतात असं राऊत यांना वाटतं. पण त्यांचा हा गैरसमज दूर केला पाहिजे. गौतमी पाटीलला विनंती करेन तुझं मेकअपच सामान राऊतांना पाठवून दे, असं सांगतानाच आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून हे महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलने करू नये, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपवर टीका केली होती. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावरही नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आज सकाळी गजानन कीर्तिकरांवर राऊतांचं फार प्रेम ऊतूजात होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गजानन कीर्तिकर, दिवाकर रावते तास न् तास बसून राहायचे. पण भेट व्हायची नाही. आज मात्र राऊत कीर्तिकरांबाबत भरभरून बोलत आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली. गजानन कीर्तिकरांबद्दल अजिबात चिंता करू नका. ते हाडामासाचे कार्यकर्ते आहेत. बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले आहेत. ते संजय राऊतांसारखे नाहीत, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

राऊत ब्लॅकमेल करत आहेत

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेच्या आमदारांना सर्वात कमी निधी मिळायचा. आणि आता राऊत भाजपबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरेंचे भाऊ त्यांना जेवढा सन्मान देत नसत तेवढा सन्मान उद्धव ठाकरेंना फडणवीस द्यायचे. एवढं नुकसान होऊन ही उद्धव ठाकरे राऊतांना सोडत नाही. संजय राऊतांकडे असं काय आहे? माझ्या माहितीनुसार संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना ब्लॅकमेल करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

सुनील राऊतांची धमकी

संजय राऊत जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा त्यांच्या भावाला काही कागदपत्रे हवी होती. ती दिली नाहीत म्हणून सुनील राऊत यांनी सामना कार्यालयात कांगावा केला होता. कागदपत्रे दिली नाहीत तर उद्धव ठाकरेंना रस्त्यावर आणू अशी धमकी सुनील राऊत यांनी दिली होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

लंडनला का जात आहेत?

उद्धव ठाकरे आणि कुटुंब एक महिना लंडनला जात आहे. उद्धव ठाकरे नेमके लंडनला चाललेत की लंडन व्हाया स्वित्झर्लंडला चाललेत. काळा पैसा ठेवायला चाललेत का? त्यांनी लवकर जावं. परत आल्यावर किती आमदार तुमच्या सोबत असतील याचा अनुभव घ्यावा. प्रत्येक आमदार सोडून जायला कारण म्हणजे संजय राऊत यांचा रोज वाजणारा भोंगा, अशी टीकाही त्यांनी केली.

आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.