Sudhir Mungantiwar on Sanjay Raut : संजय राऊतांना अटक ही तर श्रींची इच्छा, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची टीका

सत्तेत असताना आपण अमर पट्टा घेऊन आलो आहोत, असा भाव संजय राऊतांना होता. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यासाठी हेच कारणीभूत आहेत. कधी पत्रा चाळवासीयांचे दुःख समजून घेतले पाहिजे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar on Sanjay Raut : संजय राऊतांना अटक ही तर श्रींची इच्छा, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची टीका
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 5:17 PM

चंद्रपूर : शिवसेना खासदार संजय राऊत यांना काल ईडीनं अटक केली. आज त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. संजय राऊत यांची अटक ही एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला (Political Activist) अटक आहे. त्यांचे कर्मच असे फळ देऊन गेले. संजय राऊतांना अटक ही तर श्रींची इच्छा, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी कधीही वंचितांचे- बेरोजगारांचे- शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले नाहीत. मुंबईतून मराठी माणूस (Marathi Man) हद्दपार होण्यासाठी हेच कारणीभूत असल्याचे मुनगंटीवार यांनी टीकास्त्र सोडले. संजय राऊत हे अडीच वर्ष खलनायकी (Villain) भूमिकेत होते. त्यांनी कधीही वंचितांचे प्रश्न मांडले नाहीत. त्याऐवजी आमदारांना रेडे म्हणत महिलेलाही अपशब्द वापरले. 70 सेकंदात 70 शिव्या देण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. राऊतांनी महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी शेतकरी आंदोलनातील टीकैत यांचीही गळाभेट घेतली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मुंबईतील मेट्रो अडविली

सत्तेत असताना आपण अमर पट्टा घेऊन आलो आहोत, असा भाव संजय राऊतांना होता. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यासाठी हेच कारणीभूत आहेत. कधी पत्रा चाळवासीयांचे दुःख समजून घेतले पाहिजे, असेही मुनगंटीवार म्हणाले. मुंबईकरांचे आयुष्य सुखकर होण्यासाठी मेट्रो महत्त्वाची होती. ती देखील यांनी अडवली. सरकारी वकिलाकरवी कट रचून विरोधी पक्षांना अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना अटक ही तर श्रींची इच्छा, असेही मुनगंटीवार म्हणाले.

शिवसेनेकडून राऊतांच्या समर्थनार्थ आंदोलन

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेचा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला. जटपुरा गेट परिसरात शिवसैनिकांनी जोरदार निषेध आंदोलन आणि घोषणाबाजी केली. राऊत यांची अटक हे भाजपचे घाणेरडं राजकारण आहे. भाजपचं आम्ही शरणागती पत्करावी म्हणून हे दबावाचं राजकारण सुरू आहे, असा शिवसैनिकांचा आरोप आहे. राऊत हे भाजपचं राजकारण उघड करत होते. म्हणून त्यांना अटक करणाऱ्या ईडीचा शिवसेनेने निषेध केला आहे.

हे सुद्धा वाचा

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.