साताऱ्यात काळजाचा ठोका चुकवणाऱ्या 2 घटना, देवरुखवाडीवर दरड कोसळली, पाटणच्या आंबेकरमधील काही घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली

साताऱ्यात देवरुखवाडीवर दरड कोसळून पाच घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली होती. त्यातल्या 27 नागरिकांना बाहेर काढण्यात आलंय. तर पाटणच्या आंबेघर येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे.

साताऱ्यात काळजाचा ठोका चुकवणाऱ्या 2 घटना, देवरुखवाडीवर दरड कोसळली, पाटणच्या आंबेकरमधील काही घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली
साताऱ्याच्या देवरुखवाडीत दरड कोसळली तर पाटणमध्येही घरं मातीखाली
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 11:08 AM

सातारा : साताऱ्यात देवरुखवाडीवर दरड कोसळून पाच घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली होती. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करुन 27 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय तर अजूनही 2 महिला बेपत्ताच आहेत.

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका

काल संध्याकाळी 6.30 वाजणेच्या सुमारास मौजे कोंढावळे, ता. वाई जि. सातारा येथील देवरुखवाडी मध्ये अतिवृष्टीने भूस्खलन झालं. यामध्ये 5 घरं पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्या खाली दबली गेली. तसेच मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका करण्यात आलेली असून, अजून 2 महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आहेत.

बेपत्ता महिलांना शोधण्याचे काम सुरु

ढिगाऱ्याखालून सुटका केलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. अतिवृष्टीमुळे रेस्क्यू मोहीम थांबवण्यात आलेली होती. मात्र सकाळ पासून पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरु करत बेपत्ता महिलांना शोधण्याचे काम सुरू आहे.

20 ते 25 जनावरे दगावली

27 नागरिकांना सुखरुप बाहेर काढलं असलं तरी मुक्या प्राण्यांचे जीव मात्र गेलेत. या भूस्खलनात 20 ते 25 जनावरे दगावली आहेत. आणखीही रेस्क्यू ऑपरेशन टीम त्यांचं काम करत आहे.

पाटणमध्ये दरड कोसळली, आंबेकरमधील घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली, 03 कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता

पाटण तालुक्यातील मोरणा विभागात असणाऱ्या आंबेघर येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सद्यस्थितीत समोर येत आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आहे. मुसळधार पावसामुळे मदत कार्यामध्ये अडचणी येत आहेत या भागातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे तर किल्ले मोरगिरी येथेही दरड कोसळल्याने महादेवाचे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहे. येथील परिसरातील ग्रामस्थांना प्रशासनाने इतरत्र हलवले आहे ही घटना ही गुरुवारी सायंकाळी घडली आहे.

(Satara Devrukhwadi And Patan Landslide Maharashtra Rain Update)

हे ही वाचा :

Maharashtra Rains : कोल्हापुरात दसरा चौकापर्यंत पाणी, सांगलीत कृष्णेचं विक्राळ रुप, साताऱ्यात 7-8 घरं ढिगाऱ्याखाली

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.