म्हसवड ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर सशर्त रथोत्सवाला परवानगी, प्रशासनाकडून बाहेरच्या भाविकांनी प्रवेशबंदी
सातारा जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात म्हसवड ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत बाजारपेठ बंद ठेवली होती. अखेर प्रशासन आणि म्हसवड ग्रामस्थ यांच्यात चर्चा झाल्यानंतर काही अटींवर म्हसवडच्या सिद्धनाथ आणि जोगेश्वरी देवीचा रथोत्सवाला परवानगी देण्यात आली आहे.
सातारा: ओमिक्रोन (Omicron) वेरिएंटचा धोका ओळखून सातारा (Satara) जिल्ह्यातील प्रशासनानं 5 डिसेंबरला होणारी माण म्हसवडची (Mhaswad ) यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला होता. लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असणाऱ्या सिद्धनाथ व देवी जोगेश्वरीचा यावर्षीही रथ सोहळा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं. यात्रा रद्द करण्यासंदर्भात माणचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी आदेश जारी केले होते. सातारा जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात म्हसवड ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत बाजारपेठ बंद ठेवली होती. अखेर प्रशासन आणि म्हसवड ग्रामस्थ यांच्यात चर्चा झाल्यानंतर काही अटींवर म्हसवडच्या सिद्धनाथ आणि जोगेश्वरी देवीचा रथोत्सवाला परवानगी देण्यात आली आहे.
ग्रामस्थ आक्रमक, पोलिसांकडून तातडीनं बैठक
सातारा जिल्ह्यातील रविवारी होणारा श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरी यांचा रथोत्सव सोहळा जिल्हा प्रशासनाने रद्द केला गेल्याचं कळताच याच्या निषेधार्थ आज ग्रामस्थ आक्रमक झाले होते .म्हसवड गावातील बाजारपेठा सर्व दुकाने बंद करून प्रशासनाचा ग्रामस्थांनी निषेध केला.रविवारी पार पडणारा श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरीचा रथोत्सव सोहळा ओमिक्रोन व्हायरसचा पार्श्वभूमीवर प्रशासनाने रद्द केला. या निर्णयाबाबत स्थानिक ग्रामस्थांनी स्थानिकांच्या उपस्थितीत रथोत्सव साजरा करण्याची प्रशासनाला विनंती केली होती. ग्रामस्थ आक्रमक भूमिकेत आहेत असं कळताच प्रशासन म्हसवड मध्ये दाखल झालं. यानंतर ग्रामस्थ, यात्रा कमीटी आणि पोलीस प्रशासन यांच्या मध्ये बैठक झाली. या बैठकीत रथोत्सवाला काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे.
नगर प्रदक्षिणेऐवजी मैदानात रथोत्सव
रथाची नगरप्रदक्षिणा न करता ठरवून दिलेल्या मैदानात हा रथोत्सव करण्याचं सांगण्यात आलं आहे. गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. यामुळे ग्रामस्थांनी सुरु केलेलं आंदोलन आता स्थगित करण्यात आलं असून बंद केलेली बाजारपेठ सुद्धा उघडण्यात आली आहे.
बाहेरगावच्या भाविकांना प्रवेश बंदी
सातारा जिल्हा प्रशासनानं काही अटींवर रथोत्सवाला परवानगी दिलेली आहे. मात्र, बाहेगावच्या भाविकांना म्हसवड शहर आणि यात्रा मैदानात प्रवेश बंदी केली आहे. सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यात्रा मैदानात विविध व्यावसायिकांची दुकाने थाटण्यास सुद्धा बंदी कायम ठेवण्यात आली आहे. या बंदी आदेशामुळे यात्रा मैदान रिकामे दिसत आहे.
इतर बातम्या:
Devendra Fadnavis: संजय राऊतांचे नेते बदलले; देवेंद्र फडणवीसांनी घेतली तीन नेत्यांची नावे
VIDEO: यूपीए कुठे आहे? ममता बॅनर्जींच्या प्रश्नात दम, पण…; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Satara District gave permission to Mhaswad Yatra of Siddhanath on some terms after villagers angry