‘बेळगावात 15 टक्के मराठी भाषिक’ कर्नाटकच्या जनगणनेत अजब निष्कर्ष, या विरुद्ध कोर्टात जाणार, सतेज पाटील यांची भूमिका

कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिक जनतेची मुस्कटदाबी करण्याचे सातत्यानं प्रयत्न करण्यात येतात. सीमाभागात राहणाऱ्या बेळगाव, निपाणी, कारवार मधील मराठी भाषिकांवर सातत्यानं अन्याय केला जातो

'बेळगावात 15 टक्के मराठी भाषिक' कर्नाटकच्या जनगणनेत अजब निष्कर्ष, या विरुद्ध कोर्टात जाणार, सतेज पाटील यांची भूमिका
Belgaum
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 9:38 AM

कोल्हापूर: कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिक जनतेची मुस्कटदाबी करण्याचे सातत्यानं प्रयत्न करण्यात येतात. सीमाभागात राहणाऱ्या बेळगाव, निपाणी, कारवार मधील मराठी भाषिकांवर सातत्यानं अन्याय केला जातो. कर्नाटक सरकारनं केलेल्या भाषिक जनगणनेत मराठी भाषिकांची संख्या कमी दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय. बेळगावात फक्त 15 टक्के मराठी भाषिक असल्याचा अजब निष्कर्ष कर्नाटक सरकारनं काढलाय. सीमाभागातील मराठी भाषिकांचा लढा कमजोर करण्याचा हा प्रयत्न असल्याचं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. याविरोधात आपल्याला कोर्टात जावं लागेल, असं पाटील म्हणाले आहेत.

बेळगावात फक्त 15 टक्के मराठी भाषिक?

कर्नाटक राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी भाषिक जनगणना करण्यात आली होती. त्या भाषिक जनगणनेत 15 टक्के मराठी भाषिक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. कर्नाटक सरकारने केलेल्या भाषिक जनगणनेचा या अजब निष्कर्षामुळं मराठी भाषिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

मराठी भाषिकांचा लढा कमजोर करण्याचा प्रयत्न

गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी बेळगावात मराठी भाषिकांची संख्या केवळ 15 टक्के असल्याचं दाखवून सीमाभागातील मराठी भाषिकांचा लढा कमजोर करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप केला आहे.

सतेज पाटील यांनी कर्नाटक सरकारचं मराठी भाषिकांचा लढा कमजोर करण्याचं षडयंत्र हाणून पाडलं पाहिजे, असं सतेज पाटील म्हणाले. कर्नाटक सरकारचं षडयंत्र हाणून पाडण्यासाठीवेळ प्रसंगी कोर्टात देखील याविरोधात जावं लागेल, असं सतेज पाटील म्हणाले. कर्नाटक सरकारनं बेळगावातील मराठी भाषिक जनतेची टक्केवारी जाहीर करताना कोणता निकष लावून जनगणना केली याची माहिती देखील घ्यावी लागेल, असंही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

बेळगाव महापालिकेत भाजपची सत्ता

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 35 वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आहे. पहिल्यांदाच पक्षपातळीवर झालेल्या या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. त्यामुळे आता बेळगाव महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागलं. बेळगाव महापालिका निवडणुकीत केवळ 4 नगरसेवक वगळता उर्वरित नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळे महापालिका सभागृहात नवख्या नगरसेवक-सेविकांचा भरणा राहणार आहे. विशेष म्हणजे यात महिलांची संख्याही अधिक आहे.

इतर बातम्या:

सहायक प्राध्यापक व्हायचंय, पीएच.डीची अट शिथील, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

NTA NEET Phase 2 : नीट फेस 2 परीक्षेची नोंदणी सुरु, 10 ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशनची संधी

Satej Patil said Karnataka Government to weak fight of Belgaon Marathi people via showing only 15 percentage in census

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.