सोलापूर महापालिका कुणाच्या नेतृत्वात लढणार?; शरद पवार घेणार आज फायनल निर्णय
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सोलापुरात येत आहेत. यावेळी सोलापूर महापालिका निवडणूक कुणाच्या नेतृत्वात लढायची याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. (Sharad Pawar in Solapur to regain NCP stronghold)
सोलापूर: सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सोलापुरात येत आहेत. यावेळी सोलापूर महापालिका निवडणूक कुणाच्या नेतृत्वात लढायची याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेचे महेश कोठे हे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
शरद पवार आज सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक आयोग कोणाच्या नेतृत्वाखाली लढायच्या याबाबतचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार घेणार आहेत. काँग्रेस, शिवसेना करत राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका निवडणुका लढविली जाणार असल्याची शक्यता आहे. मात्र याला पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा विरोध नसला तरी नाराजी आहे. यावर आज पवार निर्णय घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मतदारसंघांचा घेणार आढावा
पवार आज सोलापुरात आल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील. यावेळी महापालिकेची परिस्थिती समजून घेणार आहेत. कोणत्या कोणत्या वॉर्डात राष्ट्रवादी कमकुवत आहे याचा आढावा घेऊन पवार पदाधिकाऱ्यांना काही सूचनाही देणार आहेत. तसेच महेश कोठे आज पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करू शकतील, असंही सूत्रांनी सांगितलं.
अचानक दौरा रद्द
दरम्यान, या आधी 2 सप्टेंबर रोजी शरद पवार सोलापूर दौऱ्यावर येणार होते. मात्र, अचानक हा दौरा रद्द करण्यात आला. त्याचं कारणही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात होते. त्यानंतर तब्बल महिन्याभरानंतर पवार सोलापुरात येत आहेत.
कोठेंचा प्रवेश लांबला
पवारांच्या दौऱ्यात नगरसेवक महेश कोठे यांचा रखडलेल्या पक्ष प्रवेश होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, पवारांचा 2 सप्टेंबर रोजीचा दौरा रद्द झाल्याने कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेशही रखडला होता. शिवसेनेचे नगरसेवक महेश कोठे यांना विभागीय आयुक्तांनी अपक्ष नगरसेवक मान्यता दिली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या कोटींचा पक्षबदल यानंतरही नगरसेवक पद अबाधित राहणार आहे. पूर्वी काँग्रेस तर आता शिवसेनेचे नगरसेवक असलेले महेश कोठे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे.
सोलापूरला दुसऱ्यांदा भेट
पवार दुसऱ्यांदा सोलापूरला येणार आहेत. या आधी ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोलापुरात आले होते. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पवार आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन देशमुख यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला होता. मात्र, यावेळी त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी टाळल्या होत्या.
सोलापूर महापालिका पक्षीय बलाबल
• भाजप 49 • शिवसेना 21, • काँग्रेस 14 • राष्ट्रवादी 04 • MIM – 08 • माकप – 01 • अपक्ष/इतर – 04 • रिक्त – 01 • एकूण = 102
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 8 October 2021 https://t.co/XynZW9JJpr #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2021
संबंधित बातम्या:
माझी नाहीस तर कोणाची नाहीस, इन्स्टाग्रामवर मैत्रीनंतर तरुणीचं एक पाऊल मागे, तरुणाचं हादरवणारं कृत्य
एसबीआयच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; तीन दिवस ‘या’ वेळेत आर्थिक व्यवहार राहणार बंद
VIDEO | तराफ्याचे इंजिन बंद, भल्या पहाटे अजित पवार धरणाच्या मधोमध अडकले
(Sharad Pawar in Solapur to regain NCP stronghold)