ठरलं..! संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणणार; ‘या’ मंत्र्याने संदर्भासह कारणही स्पष्ट करून सांगितलं

हे सरकार बळीराजाचं सरकार असून पालघरमध्ये मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला न देताच त्यांना बेघर केल्याच्या घटनेवरही सत्तार यांनी बोट ठेवलं आहे.

ठरलं..! संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणणार; 'या' मंत्र्याने संदर्भासह कारणही स्पष्ट करून सांगितलं
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 6:15 PM

पालघर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार एकनाथ शिंदे यांनी बंड करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मु्ख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांच्याकडून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यावरूनच शिवसेना आणि ठाकरे गट आता आमनेसामने आले आहेत. संजय राऊत यांच्याकडून शिवसेनेवर टीका केली जात असल्याने त्यांच्यावर हक्कभंग आणला जाऊ शकतो अशी शक्यता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली आहे.

याविषयी बोलताना त्यांनी सांगितले आहे की, लोकशाही राज्यात कोणीही कोणाच्या हक्कांवर गदा आणत असेल किंवा विनाकारण कोणाला बदनाम करत असेल तर त्यांच्यावर हक्कभंग आणला जातो.

त्यामुळे त्या पद्धतीची पुढील कार्यवाही विधानसभेचे अध्यक्ष करतात असं सूचक वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

अब्दुल सत्तार आज पालघरमध्ये आले असताना बोलत होते. खासदार संजय राऊत यांच्या विरोधात 50 आमदार हक्कभंग आणणार असल्याची चर्चाही सुरू असल्याबाबत अब्दुल सत्तार यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणी आधी प्रति एकरीमागे दहा हजार रुपये देण्याचा निकष विभागीय आयुक्तांकडून सरकारला देण्यात आला आहे.

त्यामुळे त्यावर सरकर ही सकारात्मक असल्याचे मत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. अब्दुल सत्तार आज पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथे शेतकरी मेळाव्यात आले असताना पत्रकारांशी बोलत होते.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी 25 पेक्षा अधिक उपायोजना करणार असल्याचेही अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितलं .

हे सरकार बळीराजाचं सरकार असून पालघरमध्ये मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला न देताच त्यांना बेघर केल्याच्या घटनेवरही सत्तार यांनी बोट ठेवलं आहे.

याबाबत आपण संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं सत्तार यांनी यावेळी सांगितलं आहे.

तसंच पालघरमध्ये युरिया खताचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.