साईभक्त दिल्लीहून येणार शिर्डीत विमानाने, शिर्डी विमानतळावर नाईट लॅण्डींग सेवेचा श्रीगणेशा

| Updated on: Apr 09, 2023 | 1:13 PM

गेल्या तीन दिवसांपासून साईभक्त साईचरणी नतमस्तक झालेले दिसून आले. आधी रेल्वेचे जाळे आणि आता नाईट लँडींगची सुविधा झाली आहे.

साईभक्त दिल्लीहून येणार शिर्डीत विमानाने, शिर्डी विमानतळावर नाईट लॅण्डींग सेवेचा श्रीगणेशा
Follow us on

अहमदनगर : परीक्षा संपल्या. त्यात सलग तीन दिवस सुट्या आल्या. त्यामुळे शिर्डीत भाविकांची गर्दी दिसत आहे. असंख्य भाविक शिर्डीत दर्शनासाठी दाखल झालेत. साईबाबा संस्थानानं भक्तांसाठी उपाययोजना केल्या आहेत. उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे साईबाबा संस्थानच्या वतीनं ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आलेत. गेल्या तीन दिवसांपासून साईभक्त साईचरणी नतमस्तक झालेले दिसून आले. आधी रेल्वेचे जाळे आणि आता नाईट लँडींगची सुविधा झाली आहे. यामुळे शिर्डीच्या अर्थकारणाला मोठा फायदा होताना दिसतो.

उत्साहाच्या वातावरणात दर्शन

राज्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढ आहे. राज्य सरकारनं कोणतेही निर्बंध लादले नसले तरी भाविकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. भाविक उत्साहाच्या वातावरणात शिर्डीत दर्शन घेताना दिसून येत आहेत.

हे सुद्धा वाचा

साईभक्तांमध्ये मोठा उत्साह

शिर्डी विमानतळावर कालपासून नाईट लँडिंग सुविधा आजपासून सुरू झालीय. २०० हून अधिक प्रवाशांना घेऊन दिल्ली येथून पहिलेच विमान आठ वाजून १५ मिनिटांनी शिर्डी विमानतळावर दाखल झालंय. नाईट लँडिंग सुविधेमुळे साईभक्तांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला. रात्रीच्या वेळी शिर्डी विमानतळावर पहिल्याच विमानाने येणाऱ्या प्रवाशांचा काकडी गावच्या ग्रामस्थांनी शाल, पुष्प देऊन सत्कार केला.

पहिल्यांदा रात्री विमान पोहचले

काल शिर्डीच्या विमानतळावर पहिल्यांदाच रात्री विमान उतरले आहे. दिल्लीहून निघालेल्या साईभक्तांना घेऊन इंडोगो कंपनीचे विमान शिर्डी विमानतळावर उतरले आहे. अल्पावधीतच शिर्डी विमानतळाने अनेक टप्पे गाठले. आता नाईट लॅण्डींग सुविधाही कालपासून सुरू झाली आहे.

देश विदेशातील साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येत असतात. आता नाईट लॅण्डींग सुविधा सुरू झाली. त्यामुळे साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पहिल्यांदा रात्री विमानाने शिर्डीत उतरलेल्या दिल्लीहून आलेल्या साईभक्तांनी आनंद व्यक्त केलाय.

या विमान वाहतूक सेवेमुळे शिर्डीच्या अर्थकारणाला मोठा हातभार लागणार आहे. साईभक्तांसाठीसुद्धा ही पर्वणी ठरणार आहे. कारण रात्री दर्शन घेऊन आपले काम भाविकांना करता येणार आहे.