“उद्धव ठाकरेला लाज वाटली पाहिजे, तुम्ही मुख्यमंत्री असतानाच…”; शिवसेनेच्या नेत्याने ‘या’ गोष्टीवरून उद्धव ठाकरे यांची लाज काढली

मोर्चे काढायचे आंदोलन करायचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती नालायक हे हे लोकांना सांगायचे आणि एक प्रकारचा आभास निर्माण करायचा हा कार्यक्रम उद्धव ठाकरे यांचा चालू असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

उद्धव ठाकरेला लाज वाटली पाहिजे, तुम्ही मुख्यमंत्री असतानाच...; शिवसेनेच्या नेत्याने 'या' गोष्टीवरून उद्धव ठाकरे यांची लाज काढली
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 1:00 AM

मुंबई : उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये सभा झाल्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. रामदास कदम, संजय शिरसाठ यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी थेट त्यांची लाज काढली आहे. उद्धव ठाकरेला लाज वाटली पाहिजे तुम्ही मुख्यमंत्री असताना हा प्रोजेक्ट तुम्हीच आणलात आणि बारसू हेदेखील तुम्हीच सुचवले असा आणि आता कुठलं काळ तोंड करून कातळशिल्प वागायला जात आहात. तुम्हाला थोडी शरम असती तर तिकडे गेला नसता असा टोला त्यांना उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

हा माणूस किती विश्वास घातकी आहे हे फक्त एकनाथ शिंदे हेच सांगू शकतील. त्यांचे मुख्यमंत्री पद कसे घालवता येईल एवढाच सुडाच्या भावनेने हा माणूस पेटला आहे अशी जहरी टीकाही त्यांनी केली आहे.

रामदास कदम यांन त्यांच्यावर टीका करताना एकेरी भाषेत टीका करताना ते म्हणाले की, तू सर्व आमदार खासदाराना भेटला असता, फंड आणून दिला असता तर तुझ्यावर ही वेळ आली नसती अशी शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी त्यांनी तू अडीच वर्षे मातोश्रीमध्ये कोंबड्यासारखा बसून राहिला होता अशी जहरी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

जर सरकार कोसळेल तर त्यावरती तू शिका मारतोस का तू काय केलं होतं तेव्हा आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तू एकाच हेतूसाठी रान पेटवत आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

यावेळी त्यांनी बारसुमध्ये जर आता लाठीचार्ज किंवा गोळीबार झाला आणि त्यात कोणी शहीद झाले तर उद्धव ठाकरे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा ताबडतोब दाखल करा, या प्रकरणी आग लावायचे काम हेच करत आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

कोकणातील माणसांवर अन्याय आम्ही होऊच देणार नाही, कारण उद्धव ठाकरे यांनी कोकणातील नेत्यांना संपवण्याची सुपारी घेतली आहे.

उद्धव ठाकरे यांना कोकणातील लोकांचे काही घेणेदेणे नाही हा फक्त लोकांना बेगडी रूप दाखवत आहे, महाराष्ट्रातला कोणीही माणूस याच्यावर विश्वास ठेवणार नाही आता हे त्याचे मगरीचे प्रेम असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

ठाण्यातील आंदोलनात दुर्गा भोसले हिचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला होता आणखी किती लोकांचे प्राण उध्दव ठाकरेंना घ्यायचे आहेत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

मोर्चे काढायचे आंदोलन करायचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती नालायक हे हे लोकांना सांगायचे आणि एक प्रकारचा आभास निर्माण करायचा हा कार्यक्रम उद्धव ठाकरे यांचा चालू असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.