Video : रुग्णवाहिकेचा सायरन वाजताच शिवप्रेमी दक्ष, शिवरायांच्या जयंतीचा जल्लोष करणाऱ्या तरणाईकडून रस्ता मोकळा, लातूरमध्ये काय घडलं?

लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमींचा जल्लोष सुरु होता. याच दरम्यान एक अ‌ॅम्ब्युलन्स आली. यावेळी जल्लोष करणाऱ्या शिवप्रेमींनी सतर्कता दाखवली. सायरन आवाज ऐकताच सर्वांना रस्ता मोकळी केला आणि ती रुग्णवाहिका पुढे निघून गेली.

Video : रुग्णवाहिकेचा सायरन वाजताच शिवप्रेमी दक्ष, शिवरायांच्या जयंतीचा जल्लोष करणाऱ्या तरणाईकडून रस्ता मोकळा, लातूरमध्ये काय घडलं?
शिवप्रेमींकडून रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन देण्यात आला
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 10:56 AM

लातूर : कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj Jayanti) यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नव्हती. मात्र, यंदा कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानं स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्रात (Maharashtra) शिवाजी महाराजांच्या जयतीनिमित्त शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं. महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत शिवजंयतीनिमित्त शिवप्रेमींचा उत्साह दिसून आला. लातूरमध्ये (Latur) शिवप्रेमींच्या सतर्कतेचं आणि सवेंदनशीलतेचं एक आदर्श दिसून आलं. लातूरमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींचा जल्लोष सुरु होता. लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमींचा जल्लोष सुरु होता. याच दरम्यान एक अ‌ॅम्ब्युलन्स आली. यावेळी जल्लोष करणाऱ्या शिवप्रेमींनी सतर्कता दाखवली. सायरन आवाज ऐकताच सर्वांना रस्ता मोकळी केला आणि ती रुग्णवाहिका पुढे निघून गेली.

पाहा व्हिडीओ :

शिवप्रेमींची मोठी गर्दी, सायरनचा आवाज ऐकताच वाट मोकळी

लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिव प्रेमींचा जल्लोष सुरू होता. हा जल्लोष सुरु असताना एक अ‌ॅम्ब्युलन्स सायरन वाजवत आली. जल्लोष करणाऱ्या युवकांनीही परिस्थितीचं भान ठेवत अ‌ॅम्ब्युलन्सला गर्दी हटवत वाट करून दिली. लातूरमध्ये काल सायंकाळी पासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंतीचा जल्लोष सुरू होता. मोठी गर्दी झाली होती मात्र अंबुलन्सचा सायरन कानावर पडताच वाट मोकळी करून देण्यात आली.लातुरच्या अंबाजोगाई रोडवरन ही अ‌ॅम्ब्युलन्स लातूर शहरात जाण्यासाठी आली तेव्हा तिला वाट मोकळी करून देण्यात आली.

शिवप्रेमींच्या सतर्कतेचं कौतुक

रुग्णवाहिकेला वाट मोकळी करुन देण्यात आल्यामुळं लातूरच्या शिवप्रेमींचं कौतुक होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लातूरमध्ये जल्लोष साजरा करण्यात येत होता. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमींचा जल्लोष सुरु होता. यावेळीच रुग्णावहिका आली. रुग्णवाहिका आल्याबरोबर शिवप्रेमी तरुणांनी वाट मोकळी करुन दिली.

शिवजयंतीनिमित्त रक्तदान

शिवजयंतीच्या निमित्ताने लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं 521 जणांनी रक्तदान केलं आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने रक्तदानाचा महायज्ञ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या या शिबिरात 521 महिला पुरुषांनी सहभाग नोंदवला. अक्का फाउंडेशन या सामाजिक संस्थेने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

39 हजार 200 ध्वज फडकवले

शिवजयंतीच्या निमित्ताने लातूरमध्ये 39 हजार 200 भगवे ध्वज फडकवण्याचा उपक्रम राबविण्यात आला. एकता प्रतिष्ठानने हा उपक्रम राबविला. लातूर शहरातल्या सर्वच मुख्य रस्त्यांवर भगवे ध्वज लावण्यात आले होते. 39 हजार 200 ध्वज लावण्यासाठी एकता प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांना चार दिवस परिश्रम घ्यावे लागले. शिव जयंतीला सर्व शहर भगव्या ध्वजांनी सजवण्याचा हा एकता प्रतिष्ठानचा प्रयत्न होता .

इतर बातम्या :

औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेच्या गतीवर प्रश्नचिन्ह, भाजप रस्त्यावर उतरणार, डॉ. भागवत कराड यांचा इशारा

Cargo ship fire : पोर्शे, ऑडीसह 4 हजार अलिशान गाड्यांचे जहाज समुद्रात जळून खाक; अब्जावधींचं नुकसान

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.