अकोला शहरात शिव - पार्वती विवाह संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात अकोलेकरांनी मोठी हजेरी लावली होती. शहरातल्या छोटी उमरी परिसरामध्ये महादेवाच्या मंदिरावर शिवपार्वती विवाह सोहळ्यानिमित्त मोठी जत्रा भरते.
शिव-पार्वती विवाह सोहळ्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे. या विवाह सोहळ्यामध्ये तोरण ताटी, मंगलाष्टक आणि शंकराची गाणी म्हटली जातात. दोन लिंग असल्याने अंतरपाठ धरून विवाह होतो, अशी माहिती उमेश म्हैसणे यांनी दिली.
एरवी शिव-पार्वती विवाह नेहमी ग्रामीण भागातील महादेव मंदिरावर साजरा होतो. पण जिल्ह्यातलं हे महादेव मंदिर आहे की, जे शहरांमध्ये आहे. या मंदिरामध्ये शिव-पार्वती विवाह आणि मोठी जत्रा भरते.
शिव-पार्वतीचा हा विवाह सोहळा पाहण्यासाठी अकोलेकरांनी मोठी गर्दी केली होती. बच्चेकंपनीने झुल्यावर झुलण्याचा आनंद घेतला. हे एक ऐतिसाहिक मंदिर आहे. शंकर-पार्वतीच्या मूर्तीची स्थापना येथे केली आहे.
शिव-पार्वतीच्या विवाहासाठी परिसरातील नागरिक मोठी गर्दी करतात. चणे, फुटाणे विक्रीची दुकानं लागलेली असतात. महादेव मंदिर छोटी उमरीचे अध्यक्ष उमेश म्हैसणे यांनी या मंदिराचे महत्त्व सांगितलं.