राणे ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता जाते, मोदी साहेबांनाही धोका होऊ शकतो: दीपक केसरकर

शिवसेनेचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर पुन्हा एकदा टीका केलीय. नारायण राणे ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता जाते, असा टोला त्यांनी लगावलाय.

राणे ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता जाते, मोदी साहेबांनाही धोका होऊ शकतो: दीपक केसरकर
दीपक केसरकर, नारायण राणे, नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 10:04 AM

रत्नागिरी: शिवसेनेचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर पुन्हा एकदा टीका केलीय. नारायण राणे ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता जाते, असा टोला त्यांनी लगावलाय. ही मोदींची भाजप राहिलेली नाही, ही राणेंची भाजप झालंय. यांनी इतकी पाप केली आहेत ते जातात त्या पक्षाची सत्ता जाते, अशी टोलेबाजी दीपक केसरकर यांनी केली. नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांची सत्ता देखील जाऊ शकते, असं केसरकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना नारायण राणेंना घेऊ नका म्हणून सांगत होतो. मात्र, पुढं काय झालं ते आपण पाहिलयं म्हणत दीपक केसरकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढलाय.

देवेंद्र फडणवीसांना राणेंना घेऊ नका सांगत होतो

ही मोदींची भाजप राहिलेली नाही राणेंची भाजप झालीय समजा, यांनी इतकी पाप केली आहेत ते जिथ जिथ जातात त्यांची सत्ता जाते. मी देवेंद्र फडणवीस यांना परत परत सांगत होतो की यांना घेऊ नको तुम्हाला धोका आहे. मात्र, त्यांनी माझं ऐकलं नाही. पुढं काय झालं ते आपल्या सर्वांना माहिती आहे.

पुढचा धोका नरेंद्र मोदींना

नरेंद्र मोदी यांच्याशी ओळख नाही, पण पुढचा धोका त्यांना होऊ शकतो. मोठ्यात मोठ्या माणसाची सत्ता घालवण्याची ताकद राणेंमध्ये असल्याचा टोला दीपक केसरकर यांनी लगावलाय.

आता उद्योजक येतात चित्र बदलंय

केंद्रीय मंत्री इथे येतो आणि म्हणतो कोणत्याही परिस्थितीत जिल्हाबँक जिंकणार म्हणतो त्यावेळी त्यांचे कार्यकर्ते सतीश सावंत यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करतात. असा रक्त रंजित इतिहास या पूर्वीसुद्धा झाला होता त्यावेळी श्रीधर नाईक यांचा बळी गेला होता, याची आठवण दीपक केसरकर यांनी करुन दिली. पाच वर्षांपूर्वी या जिल्ह्यात उघड्यावर दंगली होत होत्या,तर कोण उद्योजक यायला तयार होत नव्हता मात्र आता बदल झालाय आता उद्योजक यायला लागले आहेत, असं दीपक केसरकर म्हणाले.

इतर बातम्या

Sameer Wankhede : मुंबई NCB ला नवा प्रमुख मिळणार , समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार, नेमकं कारण काय?

राज्यभरात शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जाणार, कर्नाटकातील घटनेनंतर राष्ट्रवादीची घोषणा

Shivsena Leader Deepak Kesarkar slam Narayan Rane said Narendra Modi will lost power due to Rane

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.