शिवसेना शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालते, शिवसैनिक भगिनीवर वार करणार नाहीत: गुलाबराव पाटील
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबईत घडलेल्या शिवसेना आणि भाजप वादाच्या विषयावरून शिवसेनेला लक्ष्य केले आहे. चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेचा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला.
जळगाव: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबईत घडलेल्या शिवसेना आणि भाजप वादाच्या विषयावरून शिवसेनेला लक्ष्य केले आहे. चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेचा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला. ‘शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे. जेव्हा जेव्हा बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंची जाहीर सभा असते, तेव्हा स्त्रीला सन्मान दिला जातो, असं गुलाबराव पाटील म्हणाले. (Shivsena Leader Gulabrao Patil gave answer to Chitra Wagh)
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जेव्हा नजराणा म्हणून आणले होते, तेव्हा अशीच आमची माता असती तर आम्ही किती सुंदर असतो, असे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले होते. शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आहे. त्यामुळे चित्रा वाघांनी सर्कशीतल्या वाघासारखं ज्या लोकांच्यामुळं टीका केली आहे, त्या भगिनीला माझी विनंती आहे. कोणत्याही भगिनीवर शिवसैनिक वार करणार नाहीत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
भगिनीवरील हल्ल्याला मान्यता नाही
सेना भवनाजवळ जो गोंधळ झाला, तेव्हा शिवसेनेकडूनही महिला होत्या आणि भाजपकडूनही महिला होत्या. भगिनींना पाहून हल्ला झाला, असे म्हणता येणार नाही. भगिनींवरील हल्ल्याच्या प्रकाराला मान्यता देऊ शकत नाही’, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
हिंदुत्वाच्या मुद्यावरुन महाजनांना टोला
जळगाव ज्यावेळी बाबरी मशिदीचा ढाचा ढासळला, तेव्हा भाजपच्या 72 नेत्यांनी बाबरीचा ढाचा आम्ही पाडला, हे तेव्हा का कबूल केले नाही. गिरीश महाजन यांनी आधी याचे उत्तर द्यावे, मग हिंदुत्त्व सिद्ध करावे’, अशा शब्दांत शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांना टोला लगावला आहे.
मंत्री गुलाबराव पाटील हे शुक्रवारी जळगावात होते. अजिंठा शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले.
चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या?
एकट्या महिलेवरती हल्ला करणं म्हणजे अस्मिता जोपासणं आहे का? हेच तुमचे संस्कार का ?बाळासाहेब असते तर त्यांनी स्वत: अशा नेभळट प्रकाराला चोप दिला असता. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवनाला जी अस्मिता आणि गरिमा मिळवून दिली होती. तुम्ही वसुली सरकारच्या कार्यकाळात सचिन वझे सारख्यांना तिथे जागा देऊन, या वास्तूला ‘वसूली भवन’ म्हणून ख्याती प्राप्त करून दिली, असा आरोप चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यासह शिवसेनेवर केला आहे.
संबंधित बातम्या:
एकट्या महिलेवरती हल्ला करणं म्हणजे अस्मिता जोपासणं आहे का? चित्रा वाघ यांचा संजय राऊत यांना सवाल
Ajit Pawar PC Uncut : बीडमधील कोरोना परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी अजित पवारांच्या महत्त्वपूर्ण सूचना
(Shivsena Leader Gulabrao Patil gave answer to Chitra Wagh)