Video: बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसैनिक, बाळासाहेबांच्या हवाल्यानं गुलाबराव पाटलांकडून ‘राड्या’ची फोड

गुलाबराव पाटील यांनी यावेळी शिवसेना नेत्यांवर सुरु असलेल्या ईडीच्या कारवायांवरुन भाजपला फटकरालं. आम्हाला जेल नवी नाही,बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसैनिक आहे.

Video: बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसैनिक, बाळासाहेबांच्या हवाल्यानं गुलाबराव पाटलांकडून 'राड्या'ची फोड
गुलाबराव पाटील
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 12:01 PM

सोलापूर: सांगोला तालुक्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाणीपुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी हजेरी लावली होती.पंढरपुर मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्या नंतर त्यानी थेट चंद्रकांतदादा पाटील यांनी 56 आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालेल्यांना इम्पिरिकल डेटा काय कळणार टीकेला उत्तर दिले. गुलाबराव पाटील यांनी यावेळी शिवसेना नेत्यांवर सुरु असलेल्या ईडीच्या कारवायांवरुन भाजपला फटकरालं. आम्हाला जेल नवी नाही,बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसैनिक आहे. एवढं लक्षात ठेवा बोकडला मरण ही परमेश्वर ठरवतो, असं गुलाबराव पाटील म्हणाले. देशावरचे व राज्यावरचे कोरोनाचे संकट कायमस्वरूपी जाऊ दे ,असे साकडे श्री विठ्ठल चरणी गुलाबराव पाटील यांनी घातले.

आम्हाला जेल नवी नाही

आमची सत्ता व्यवस्थित आहे म्हणून 50 हजारांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला की लगेच ईडीची चौकशी लावली जातेय. आम्हाला जेल नवी नाही,बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसैनिक आहे.एवढं लक्षात ठेवा बोकडला मरण ही परमेश्वर ठरवतो मग आमचं मरण ईडी ठरवणार आहे का? असा सवाल मंत्री पाटील यांनी केला.

चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर

गुलाबराव पाटील म्हणाले जर चंद्रकांतदादांनी संयमाची भूमिका घेतली असती तर हे 56 आमदार त्याच्या सोबत दिसले असते.त्यांना टीका करण्याशिवाय काय येत? असा खोचक सवाल पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटलांनी शेतकऱ्यांबद्दल बोलतात त्यांना कधी कपाशी ,गंन्ना माहीत आहे का?, असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला.

गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

मंत्री गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक करत असताना त्यांना विना लायसन्सचा ड्रायव्हर म्हणलं.कोणतीही गाडी चालवायची असेल तर लायसन्स लागतं. मात्र, सरकार चालवण्यासाठी शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जबाबदारी सोपवली ,अजितदादांनी कंडक्टर ,बाळासाहेब थोरात प्रवासी माझ्या सारख्या कार्यकर्यांना वाटलं, ड्रायव्हर अ‌ॅक्सिडंट करेल. मात्र, किती ही संकटे आली तरी दोन वर्षे झाले सरकार व्यवस्थित काम करतंय, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.

नारायण राणेंवर टीकास्त्र

केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर ही गुलाबराव पाटील यांनी जोरदार निशाणा साधला. सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले.मतलब के लिये कई लोक आपने बाप बदल देते है, अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली.

हे सरकार 5 वर्ष टिकणार

तुमची नीती तुम्ही शाबूत ठेवली नाही आणि सेनेला दोष देता. दोन वर्षांपासून सत्ता जावी म्हणून काही लोक देव पाण्यात ठेवून बसले आहेत. डोंबऱ्याचा खेळ सुरू आहे, असं भाजप नेत्यांना वाटतंय. दोरीवरून पोरगी पडेल आणि मला लग्न करायला मिळेल, असंही विरोधकांना वाटतंय, पण हे सरकार पाच वर्षे टिकेल म्हणत भारतीय जनता पक्षावर त्यांनी निशाणा साधला.

इतर बातम्या:

शिवसेनेचा दसरा मेळावा, राज्य सरकारकडून कोरोना निर्बंध शिथिल

आमचे राज्यात 22 खासदार होणार, 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी : संजय राऊत

Shivsena leader Gulabrao Patil said Shivsaink is bachelor of Jail over ED actions

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.