सिंगापूरचं स्वप्न दाखवत धुळ्याला खड्डापूर केलं, गिरीश महाजनांवर शिवसेनेची घणाघाती टीका

भाजप नेते गिरीश महाजन यांनी विकासाचे गाजर दाखवत सिंगापूर करण्याचे स्वप्न दाखवून धुळ्याला अक्षरशः खड्डापूर केला असल्याचा आरोप देखील महेश मिस्तरी यांनी केला आहे.

सिंगापूरचं स्वप्न दाखवत धुळ्याला खड्डापूर केलं, गिरीश महाजनांवर शिवसेनेची घणाघाती टीका
Girish Mahajan_Dhule Road issue_Shivsena
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 5:35 PM

धुळे: खड्डेमय झालेल्या शहरातील रस्त्यावर तत्काळ मुरुम व खडी टाकुन खड्डे बुजवण्यात यावे, यासाठी शिवसेनेच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळं नरक यातना भोगणाऱ्या धुळेकर नागरिकांना या वेदनेतून मुक्त करावे. मनपातील निद्रीस्त व भ्रष्टाचारी प्रशासनाला व भाजपाच्या सत्ताधारी यांना जागे करण्यासाठी शिवसेना धुळे महानगरातर्फे मनपाच्या प्रवेशद्वारावर घटस्थापना करण्यात आली. शिवसेनेतर्फे मनपा प्रशासन व सत्ताधारी भाजपा विरुद्ध विविध प्रकारे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले होते. नऊ दिवसाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातव्या दिवशी महापालिका प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत धुळे शहर खड्डेमुक्त करण्याबाबत सेनेच्या आंदोलन करताना लेखी आश्वासन दिलं त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. भाजप नेते गिरीश महाजन यांनी विकासाचे गाजर दाखवत सिंगापूर करण्याचे स्वप्न दाखवून धुळ्याला अक्षरशः खड्डापूर केला असल्याचा आरोप देखील महेश मिस्तरी यांनी केला आहे

सेनेची मनपा आणि सत्ताधाऱ्यांवर टीका

शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी 2 कोटी 60 लाख रुपये लागणार असून त्यासाठी 25 लाखाची निविदा काढण्यात आली आहे व टप्प्याने इतर निविदा देखील काढण्यात येणार असल्याची माहिती देत धुळे जिल्हा शिवसेना पक्षाचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी यांची मनपा प्रशासन व मनपा सत्ताधारी भाजपवर चांगलीच तोफ कडाडली आहे.

धुळ्याच्या विकासासठूी 18 रुपयांचाही खर्च नाही

धुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने चार वेळा शास्ती माफ करून 17 ते 18 कोटींची घरपट्टी धुळेकरांकडून वसूल करण्यात आली. मात्र, शहरातील विकास कामं व खड्डे दुरुस्तीसाठी मनपा प्रशासन व भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी शहरासाठी 18 रुपये देखील खर्च केले नाहीत. ‘सर्व 18 कोटी रुपये भाजप नगरसेवक व त्यांच्या नातलगांच्या ठेकावरील बिल अदा करण्यात आले, असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. कागदावरचे घोडे नाचवत धुळेकरांची फसवणुकीचे काम मनपा व सत्ताधारी भाजपाने केले आहे, असा गंभीर आरोप शिवसेना पक्षाचे धुळे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी यांनी केला आहे.

गिरीश महाजनांनी सिंगापूरचं स्वप्न दाखवलं

भाजप नेते गिरीश महाजन यांनी विकासाचे गाजर दाखवत सिंगापूर करण्याचे स्वप्न दाखवून धुळ्याला अक्षरशः खड्डापूर केला असल्याचा आरोप देखील महेश मिस्तरी यांनी केला आहे. दिल्लीच्या भाजप सरकार यांच्या इशाऱ्यावर चालणारे धुळ्यातील मनपा प्रशासन हे बगलबच्चे असल्याचा टीका देखील महेश मिस्तरी यांनी बोलताना केली आहे.

इतर बातम्या:

पुढे उमेदवारी मिळणं अशक्य, मला तुमच्या चित्रपटात तरी भूमिका द्या, गिरीश महाजनांची टोलेबाजी

अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते मराठा नको, अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते ओबीसी नको; भाजप नेते गिरीश महाजन यांचा सरकारवर हल्लाबोल

Shivsena leader Mahesh Mistri slam BJP leader Girish Mahajan over road condition of Duhle Municipal Corporation area

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.