शिवसेना आमदाराचं आगळं वेगळं आंदोलन, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी थेट पेन टाकळी प्रकल्पाच्या पाण्यात ठिय्या
पेन टाकळी प्रकल्पाचे कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कालव्याच्या सुरुवातीपासून 11 किमी पर्यंतचा कालवा पाझरून तब्बल 272 हेक्टर जमीन बाधित होत आहे. पाणी पाझरून 289 शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
बुलडाणा: पेन टाकळी प्रकल्पाचे कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कालव्याच्या सुरुवातीपासून 11 किमी पर्यंतचा कालवा पाझरून तब्बल 272 हेक्टर जमीन बाधित होत आहे. पाणी पाझरून 289 शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कालव्याचे पाणी पाझरून प्रकल्पासून 0 ते 11 किमी पर्यंतची शेती पाण्यामुळे चिभडत असून पिकांचे आणि शेत जमिनीचे नुकसान होत आहे. सदर पाणी 11 किमी पर्यंत बंद पाईपद्वारे नेण्यात यावे. 2003 पासून 2021 पर्यंतची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी , या मागणीसाठी शिवसेना आमदार संजय रायमूलकर आज सकाळपासून प्रकल्पाच्या पाण्यात मध्यभागी जाऊन आंदोलन केले आहे. ( Shivsena MLA Sanjay Raimulkar protest Pen Takali Water Project for solve 289 farmers problem )
अधिकारी उपस्थित नसल्यानं असंतोष
मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमूलकर प्रकल्पात उतरलेले असतांना देखील उच्चपदस्थ अधिकारी मात्र प्रकल्पावर हजर नव्हते. दरम्यान पाण्यातील राप्यावर बसलेल्या आमदार संजय रायमूलकर यांनी पाण्यात उडी मारली. मात्र, आमदार सोबत असलेले शेतकरी यांच्या विनंती वरून पुन्हा राप्यावर परत आलेय. मात्र, एव्हढे मोठे पाऊल आमदार उचलत असताना त्याठिकाणी एकही अधिकारी हजर नव्हते शेतकऱ्यांमध्ये यामुळे असंतोष पसरलाय.
272 हेक्टर क्षेत्र बाधित
मेहकर तालुक्यातील पेन टाकळी प्रकल्पाचा कालवा पाझरत असल्याने तब्बल 272 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान होत असून यात 289 शेतकरी बाधित होत असल्याने या बाबतचा आढावा पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी बैठकीचे आयोजन करून 22 मे रोजी घेतला. मात्र, तात्काळ सुधारित प्रस्ताव सादर करावा आणि सुधारित प्रस्ताव सादर करत असतांना तो प्रस्ताव त्रुटी असल्याच्या कारणाने परत येणार नाही याची काळजी घ्या, अशा स्पष्ट शब्दात पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी सूचना दिल्या होत्या. अधिकाऱ्यांनी आजपर्यंत सुधारित प्रस्ताव न पाठवल्याने संतप्त होत आज संजय रायमूलकर यांनी 21 जून रोजी प्रकल्पाच्या पाण्यातच आंदोलन केलं. आमदार संजय रायमूलकर आणि बाधित शेतकरी पाण्यात बसून आंदोलन करत आहेत..
नुकसानभरपाईची मागणी
सन 2003 ला पेन टाकळी प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे पहिल्यांदा सोडण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या शेतीचे कमालीचे नुकसान होऊन शेती खरडून गेली होती… तेव्हापासून 2021 पर्यंत प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे सोडल्यानंतर किमी शून्य ते 11 पर्यंतच्या 289 शेतकऱ्यांच्या तब्बल 272 हेकटर शेतीचे नुकसान होत आहे. दरवर्षी शेतीचे सह पिकांचे नुकसान होत असताना देखील 11 किमीच्या समोरील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून किमी 0 ते 11 मधील शेतकरयांनी आपले नुकसान सहन करत कालव्याद्वारे पाणी सोडायला परवानगी दिली. स्वतःचे पिकांचे आणि जमिनीचे होणारे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ एका वर्षाचा अपवाद वगळता सन 2003 ते 2021 पर्यंत एकदा देखील पाटबंधारे विभागाने नुकसान भरपाई दिली नाही.
भाजपला मोठं भगदाड, आजी माजी 12 नगरसेवक शिवसेनेत, राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी https://t.co/7KVa4CkSga #ShivSena | #BJP | #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2021
इतर बातम्या:
Video | इंजेक्शन घेणार नाही म्हणत आजोबा पळाले, नंतर नर्सने जे केलं ते एकदा बघाच !
कर्करुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता राज्य सरकारचा मोठा निर्णय, ठाण्यात मोठं हॉस्पिटल उभारणार
( Shivsena MLA Sanjay Raimulkar protest Pen Takali Water Project for solve 289 farmers problem )