Third Wave : कोरोनाची तिसरी लाट परतवण्यासाठी ठाकरे सरकारचा ॲक्शन प्लॅन, फॅमिली डॉक्टर्सबाबत मोठा निर्णय

कोरोना विरुद्धच्या लढ्यात फॅमिली डॉक्टर्सना सहभागी करुन घेतलं जाणार आहे. family doctors for combat Corona

Third Wave : कोरोनाची तिसरी लाट परतवण्यासाठी ठाकरे सरकारचा ॲक्शन प्लॅन, फॅमिली डॉक्टर्सबाबत मोठा निर्णय
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 11:37 AM

रत्नागिरी: महाराष्ट्र कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतापासूनचं कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्याला सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यातील फॅमिली डॉक्टर्सची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात फॅमिली डॉक्टर्सना सहभागी करुन घेतलं जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्सच्या माध्यमातून फॅमिली डॉक्टर्सशी संवाद साधतील, असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं आहे. (Shivsena MP Vinayak Raut said Maharashtra Government will take help of family doctors for combat Corona)

फॅमिली डॉक्टर्सची मदत का?

महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील लोक फॅमिली डॉक्टरवर जास्त विश्वास ठेवतात. फॅमिली डॉक्टर्सवर नागरिकांचा विश्वास असतो. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी फॅमिली डॉक्टर्सची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी तयार करण्यात आलेली टास्क फोर्स त्यांना मार्गदर्शन करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्सच्या माध्यमातून फॅमिली डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली.

कोरोनात प्राथमिक उपचार काय करावे याचं मार्गदर्शन

राज्यातील तिसरी लाट थोपवण्यासाठी राज्य सरकारने आता आणखी एक प्रयत्न सुरु केलाय. राज्यातील विभागवार फॅमिली डॉक्टरांशी टास्क फोर्स संवाद साधणार आहे. यामधून कोरोनामध्ये प्राथमिक उपचार काय केले जावे याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. कारण समान्य माणूस हा आपल्या फॅमिली डॉक्टरवर जास्त विश्वास ठेवतो. त्यामुळ फॅमिली डॉक्टरना कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी करुन घेतलं जाणार आहे.

विनायक राऊत यांच्यावर जबाबदारी

शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर महाराष्ट्रातील फॅमिली डॉक्टरांची मोट बांधण्याची जबाबदारी देण्यात आलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्सच्या माध्यमातून या फॅमिली डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत. रविवारी पहिल्यांदा मुंबईतील डॉक्टरांशी संवाद साधला जाणार आहे. त्यानंतर रविवारीच रत्नागिरी आणि सिंदुदूर्गमधील दोन हजार फॅमिली डॉक्टरांशी संवाद साधला जाणार आहे. टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे हा संवाद साधला जाणार आहे. येत्या एक महिन्याच्या कालावधीत राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टरांशी संवाद साधून त्यांना कोरोनाच्या लढ्यात सहभागी करुन घेतलं जाणार आहे. फॅमिली डॉक्टरांना कोरोना लढ्यात सहभागी करुन घेण्याचा हा भारतातील पहिलाच उपक्रम असल्याचं विनायक राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या:

कोरोना लसीकरणासाठी ब्लू प्रिंट तयार; तीन टप्प्यात होणार लसीकरण

‘या’ राज्यांंमध्ये कोरोनाची लस मोफत! महाराष्ट्रात काय स्थिती? जाणून घ्या एका क्लिकवर

(Shivsena MP Vinayak Raut said Maharashtra Government will take help of family doctors for combat Corona third wave)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.