गुलाबराव पाटील यांच्या कव्वाली गायनावर निलेश राणेंचं वादग्रस्त ट्विट, जळगावात शिवसैनिक आक्रमक
जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ आणि निलेश राणेंच्या कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसैनिक राणेंचा पुतळा जाळणार असल्याचेही शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
जळगाव: शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात कव्वाली गायन केले होते. याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष्य केले आहे. निलेश राणेंनी आपल्या ट्विटर हँडलवर शिवराळ भाषेत मंत्री गुलाबराव पाटील यांना उद्देशून ट्विट केले आहे. निलेश राणेंनी केलेल्या ट्विटमुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक राणेंच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. आज जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पोलीस ठाण्यात निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी शिवसनिकांना दिले आहेत.
निलेश राणेंचं ट्विट
सुपारी चोर गुलाब पाटीलसाठी हा योग्य कार्यक्रम आहे. इतर वेळेला कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा या भाडखाऊ गुलाबाने कव्वाली गात राहावी, असं सगळं बघून स्वर्गीय बाळासाहेबांची आठवण जास्त येते, आता शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि MIM पक्षाच्या दिशेने जोरदार सुरू आहे. <ahref=”https://t.co/iPjL0R8olD”>https://t.co/iPjL0R8olD
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 6, 2021
राणे आणि शिवसेना नवा वाद रंगण्याची शक्यता
निलेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये शिवसेनेवरही जोरदार टीका केली असून, ‘असं बघून स्वर्गीय बाळासाहेबांची जास्त आठवण येते, आता शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या दिशेने जोरदार सुरू आहे’, अशा शब्दांत घणाघात केला आहे. निलेश राणेंच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राणे आणि शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
गुलाबराव पाटील यांचं कव्वाली गायन
शिवसैनिक निलेश राणेंचा पुतळा जाळणार
दरम्यान, आज जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ आणि निलेश राणेंच्या कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसैनिक राणेंचा पुतळा जाळणार असल्याचेही शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
इतर बातम्या:
अनिल देशमुखांना झटका, 12 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा ईडी कोठडी, मुंबई हायकोर्टाचा निर्णय
‘उडता पंजाब’ नंतर ‘उडता महाराष्ट्र’ करण्याचा गेम होत; नवाब मलिक यांचा दावा
Shivsena Party workers angry over Nilesh Rane tweet on Gulabrao Patil