Video : धक्कादायक! अख्खे घर 70 फूट जमिनीत गडप, भूमिगत कोळसा खाणीचा परिणाम, चंद्रपुरातील घुग्गुस येथील प्रकार

घुग्गुसमधील अमराई वॉर्डात गजानन मडावी यांचं घर आहे. शुक्रवारी दुपारची घटना. घरी कुणीच नव्हते. जोरदार भूस्खलन झाले. अख्ख घर जमिनीत सुमारे 70 फूट खोल गेले.

Video : धक्कादायक! अख्खे घर 70 फूट जमिनीत गडप, भूमिगत कोळसा खाणीचा परिणाम, चंद्रपुरातील घुग्गुस येथील प्रकार
अख्खे घर 70 फूट जमिनीत गडप, भूमिगत कोळसा खाणीचा परिणाम
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 6:53 AM

चंद्रपूर : शहरालगतच्या घुग्गुस येथे धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. कोळसा खाणींचा भाग असलेल्या या गावातील आमराई वार्डात एक उभे घर थेट सत्तर फूट खाली जमिनीत गडप झाले. या गावात सर्वत्र असलेल्या भूमिगत कोळसा खाणीमुळे हा प्रकार झाल्याची चर्चा आहे. गजानन मडावी (Gajanan Madavi) यांचे राहते घर अचानक हलू लागल्याने घाबरून जात घरातील सदस्य बाहेर पडले. काही क्षणातच अख्खे घर 70 फूट जमिनीत गडप झाल्याने आसपासच्या नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या खाणीमुळे या परिसरात अनेकदा घरे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा पद्धतीने एकच घर 70 फूट गडप होण्याची ही धक्कादायक घटना प्रथमच उजेडात आली आहे. घटनास्थळी महसूल- खाण प्रशासन (Mines Administration) व पोलिसांचे पथक (Squad of Police) दाखल झाले आहे. परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.

पाहा व्हिडिओ

अचानक घर जमिनी झाले गडप

घुग्गुसमधील अमराई वॉर्डात गजानन मडावी यांचं घर आहे. शुक्रवारी दुपारची घटना. घरी कुणीच नव्हते. जोरदार भूस्खलन झाले. अख्ख घर जमिनीत सुमारे 70 फूट खोल गेले. घरी कुणीचं नसल्यानं प्राणहानी टळली. परंतु, अख्ख घर जमिनीत गडप झाले. या परिसरात पूर्वी वेकोलिच्या भूमिगत खाणी होत्या. कोळसा काढल्यानंतर त्याठिकाणी रेती भरली जात होती. पण, रेती न भरल्यानं काही भूभाग असाच पोखळ ठेवण्यात आला असावा. त्यामुळं ही घटना घडली असावी.

हे सुद्धा वाचा

सुरक्षित ठिकाणी हलविण्याचं स्थानिकांचं आवाहन

यापूर्वी आमराई वॉर्डात तसेच नकोडा गावात अशा घटना घडल्या आहेत. कालच्या घटनेमुळं सुरक्षेच्या दृष्टीने इतर कुटुंबीयांना इतरत्र हलविण्याची प्रक्रिया नगर परिषदेने सुरू केली. मडावी कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था नगर परिषदेकडून करण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट दिली. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. या घटनेमुळं आमराई वॉर्डात प्रचंड खळबळ उडाली. इतर कुटुंबीय जीव मुठीत घेऊन वेळ काढत आहे. आम्हीला सुरक्षित ठिकाणी हलवावं, असं स्थानिकांचं म्हणणंय.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.