मोठी बातमी ! श्री श्री रविशंकर यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर महिला पडल्या… रेटारेटी अन्…; जालन्यात नेमकं काय घडलं?

चिंता करू नका चिंतन करा. मन प्रसन्न असेल तर शरीर तंदुरुस्त राहील. आता हरघर चिंतन योजना सुरू केली पाहिजे. आदर्श गाव बनवा, नैसर्गिक शेती बनवा, विदेशी वस्तू वापरून नका.

मोठी बातमी ! श्री श्री रविशंकर यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर महिला पडल्या... रेटारेटी अन्...; जालन्यात नेमकं काय घडलं?
Shri shri ravi shankarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 3:07 PM

जालना: अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आज जालन्याच्या दौऱ्यावर आहेत. शेतकरी मेळाव्याला संबोधित करण्यासाठी ते आले होते. श्री श्री रविशंकर येणार असल्याची माहिती मिळाल्याने या मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली. हा मेळावा संपला तेव्हा श्री श्री रविशंकर यांचं दर्शन घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. मात्र, या गर्दीतून वाट काढत श्री श्री रविशंकर यांचा ताफा निघाला. पण गर्दी काही मागे हटायला तयार नव्हती. महिलांनी श्री श्री रविशंकर यांचं दर्शन घेण्यासाठी एकच गलका केला. त्यामुळे रेटारेटी झाली अन् महिला श्री श्री रविशंकर यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर येऊन पडल्या. वाहनचालकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ ब्रेक दाबल्याने मोठा अनर्थ टळला.

जालन्यातील शेतकरी मेळावा संपल्यानंतर श्री श्री रविशंकर जायला निघाले होते. त्यांच्या वाहनांचा ताफा निघाला होता. पण सुरक्षा व्यवस्था भेदून महिलांनी श्री श्री रविशंकर यांच्या वाहनाच्या ताफ्याच्या दिशेने धाव घेतली. एकाच वेळी महिलांचा जत्था वाहनांच्यासमोर आला.

हे सुद्धा वाचा

त्याचेवळी रेटारेटी झाली अन् काही महिला वाहनांच्यासमोरच पडल्या. मात्र, वाहन चालकांनी प्रसंगावधान राखून लागलीच ब्रेक दाबलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाही तर या वाहनांखाली महिला चिरडल्या गेल्या असत्या असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

कसे आहात?

दरम्यान, श्री श्री रविशंकर यांनी शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. कसे आहात? अशी आस्थेने विचारपूस करत त्यांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली. यावेळी त्यांनी जलतारा योजनेचं कौतुक केलं. जल आहे तर जीवन आहे. आपल्या देशात पाण्याचं पाणी केले जाते, असं श्री श्री रविशंकर यांनी सांगितलं.

शिंदेंचं अनुकरण करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले. 70 टक्के काम आर्ट ऑफ लिविंगमुळे झाले आहे. धर्माला सोडून सत्तेत गेलं तर जास्त वेळ सत्ता टिकत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामान्य लोकांसाठी काम करतात. मी एकदा त्यांना कॅल केला होता. तेव्हा ते रात्री 12 वाजता कार्यक्रमात होते. त्यांचं अनुकरण इतरांनी केले पाहिजे, असं ते म्हणाले.

हसत जा

जालन्याची भूमी खूप चांगली आहे. जालन्याने सर्वात आधी स्वच्छतेचं अभियान सुरु केलं. नंतर ते सर्वत्र पोहोचलं. आता जलतारा देखील सर्वत पोहचेल. शेतकऱ्यांनो, तुम्ही एकटे नाही तर आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुमची समस्या जाणून घेण्यासाठी आलोय. इथून जाताना हसत जा, तरच सत्संगाच महत्व कळेल, असं त्यांनी सांगितलं.

स्वदेशीच वापरा

चिंता करू नका चिंतन करा. मन प्रसन्न असेल तर शरीर तंदुरुस्त राहील. आता हरघर चिंतन योजना सुरू केली पाहिजे. आदर्श गाव बनवा, नैसर्गिक शेती बनवा, विदेशी वस्तू वापरून नका, स्वदेशी वस्तूला प्राधान्य द्या, असं आवाहन त्यांनी केलं.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.