आंबोलीत पर्यटकांची गर्दी; पोलिसांकडून अटकाव, पर्यटकांचा हिरमोड, हताश होऊन माघारी!

पर्यटनासाठी बंदी असून देखील मोठ्या संख्येने राज्याच्या काना कोपऱ्यातून पर्यटक आंबोलीत दाखल झाले आहेत. राज्याच्या बाहेरुन देखील अनेक पर्यटक आंबोलीत आले असून चेकपोस्टवर पर्यटकांच्या गाड्या अडवून माघारी पाठवल्या जात आहेत.

आंबोलीत पर्यटकांची गर्दी; पोलिसांकडून अटकाव, पर्यटकांचा हिरमोड, हताश होऊन माघारी!
पर्यटन स्थळांवर बंदी असून देखील आंबोलीत पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 12:28 PM

सिंधुदुर्ग : पर्यटन स्थळांवर बंदी असून देखील आंबोलीत पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. देशभर प्रसिद्ध असलेल्या आंबोलीच्या धबधब्यावर पर्यटकांना जाण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात येत आहे. पोलिस पर्यटकांना पुढे जाऊ देत नाहीत. त्यांना चेकपोस्टवरुनच माघारी पाठवत आहेत. त्यामुळे पर्यटक निराश मनाने तिथूनच माघारी फिरत आहेत.

पर्यटनासाठी बंदी असून देखील मोठ्या संख्येने राज्याच्या काना कोपऱ्यातून पर्यटक आंबोलीत दाखल झाले आहेत. राज्याच्या बाहेरुन देखील अनेक पर्यटक आंबोलीत आले असून चेकपोस्टवर पर्यटकांच्या गाड्या अडवून माघारी पाठवल्या जात आहेत.

नाईलाजाने पर्यटक लांबूनच आंबोली धबधब्याचं सौंदर्य डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून निराश होऊन माघारी परतत आहेत. दरवर्षी विकेंडमध्ये या धबधब्यावर पर्यटकांची एवढी गर्दी असते की पाय ठेवायला ही जागा नसते. कोरोनाच्या सावटामुळे पर्यटकांना पर्यटन स्थळांवर बंदी करण्यात आली आहे.

लोणावळ्याच्या भुशी डॅम परिसरात नाकाबंदी

पावसाळी वातावरणात पर्यटकांची पावलं आपसूकच धरणं, धबधबे यासारख्या ठिकाणी वळतात. पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात (Bhushi Dam) पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. शनिवारी पर्यटकांनी गर्दी केल्याचं वृत्त ‘टीव्ही9 मराठी’ने दाखवल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली. मात्र पोलिसांची नजर चुकवत पर्यटकांनी परिसरातील धबधब्यांकडे कूच केलं.

पोलिसांनी थेट भुशी डॅमकडे जाणाऱ्या मार्गावरच नाकाबंदी केली आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना भुशी धरण परिसरातूनच परत पाठवले जात आहे. काल याच ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. यासंबंधी वृत्त ‘टीव्ही9 मराठी’ने प्रसारित केल्यावर प्रशासन खडबडून जागं झाल्याचं दिसत आहे. मात्र भुशी धरण परिसराआधी जे धबधबे आहेत त्या धबधब्यांवर पोलिसांची नजर चुकवत पर्यटकांनी गर्दी केली.

(Sindhudurg Amboli ghat WaterFall Area Police Nakabandi)

हे ही वाचा :

डॅम इट! भुशी डॅम परिसरात नाकाबंदी, पोलिसांची नजर चुकवत पर्यटकांची धबधब्यांवर गर्दी

पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळावर कलम 144, पर्यटनासाठी बाहेर पडाल तर कारवाई होणारच!

'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?.
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?.
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य.
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?.
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'.