जरंडेश्वर प्रकरणी ईडीची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला नोटीस आली का? बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी नेमकं काय सांगितलं?

ईडीनं (ED) जरंडेश्वर साखर कारखान्याच्या (Jarandeshwar Sugar Mill) कर्जप्रकरणी पुणे आणि सातारा जिल्हा बँके पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस दिल्याची चर्चा सुरु झाली होती.

जरंडेश्वर प्रकरणी ईडीची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला नोटीस आली का? बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी नेमकं काय सांगितलं?
सतिश सावंत
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 11:46 AM

सिंधुदुर्ग: अंमलबजावणी संचनालयानं म्हणजेच ईडीनं (ED) जरंडेश्वर साखर कारखान्याच्या (Jarandeshwar Sugar Mill) कर्जप्रकरणी पुणे आणि सातारा जिल्हा बँके पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस दिल्याची चर्चा सुरु झाली होती. जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्ज दिल्या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला देखील ईडीकडून पत पुरवठ्याबाबत नोटीस आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जरंडेश्वर साखर कारखान्याशी थेट संबंध नसून पुणे जिल्हा बँकेमार्फत केलेल्या पतपुरवठया संदर्भात ईडीकडून माहितीसाठी पत्र आले असून ईडीने बँकेवर कोणत्याही प्रकारे नोटीस बजावली नसल्याचं स्पष्टीकरण जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी दिलं आहे.

विरोधकांनी पसरवलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नका

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी राजकीय विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या बातम्यांवर बँकेच्या ठेवीदारांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व ठेवीदारांच्या ठेवी या बँकेत सुरक्षित असल्याची माहिती ही सतिश सावंत यांनी दिली आहे.

जरंडेश्वरला नेमकं कर्ज कसं दिलं?

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यास सन 2017-18 या आर्थिक वर्षापासून पुणे जिल्हा बँकेच्या सहभागातून व त्यांच्यामार्फत बँकेने मशिनरी आधुनिकीकरण व सहवीज निर्मीती व इथेनॉल प्रकल्पासाठी कर्जपुरवठा केला असून बँकेने वितरीत केलेल्या सर्व प्रकारच्या वसुली जून २०२१ अखेर नियमित सुरू असून बँकेने दिलेल्या कर्जासाठी पुरेसे तारण घेण्यात आलेले आहे, असं सतिश सावंत यांनी सांगितलं.

ईडीनं मागितलेली माहिती देणार

अंमलबजावणी संचनालयाने (ED) ने बँकेकडे जरंडेश्वर साखर कारखान्याला पुरवठा केलेल्या कर्जाची माहिती बँकेकडे मागितली असून त्या कागदपत्रांची पूर्तता करणार असल्याची माहिती ही सतिश सावंत यांनी दिली आहे.

ईडीच्या नोटीसची चर्चा कशी सुरु झाली?

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी जरंडेश्वर प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने 2014 मध्ये जरंडेश्वरला कर्ज दिलं होतं अशी माहिती काल दिली होती. यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना सोमवारी विचारले असता त्यांनी आपल्याला यातली काही कल्पना नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, आज त्यांनी ईडीच्या पत्राबाबत खुलासा केला आहे.

इतर बातम्या:

“ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, त्यांनी…” बाई, बुब्स आणि ब्रा… अभिनेत्री हेमांगी कवीचं सडेतोड मत

Maharashtra Rain Update: कोकण आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Sindhudurg District Central Co Operative Bank President Satish Sawant said ED asked about loan lent to Jarandeshwar which gave through Pune Bank

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.