‘दिशा सालियन फाईल्स’ हा चित्रपट ओटीटीवर येणार, नितेश राणे यांचं मोठं विधान; गोत्यात कोण?

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. कामगार दिनाच्या पण शुभेच्छा. विशेषतः संजय राजाराम राऊत यांना कामगार दिनाच्या विशेष शुभेच्छा द्यायच्या आहेत. असा कामगार कोणालाही मिळू नये अशी इच्छा मी व्यक्त करेन, असा चिमटा नितेश राणे यांनी काढला.

'दिशा सालियन फाईल्स' हा चित्रपट ओटीटीवर येणार, नितेश राणे यांचं मोठं विधान; गोत्यात कोण?
nitesh raneImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 12:45 PM

सिंधुदुर्ग : येत्या एक दोन दिवसात सुधीर मुनगंटीवार यांना भेटून केरला स्टोरीला करमुक्त करावं अशी विनंती करणार आहे. केरला स्टोरी पहिल्या दिवसापासून टॅक्स फ्री करावा म्हणून मागणी करणार आहे. केरला स्टोरी सारखाच काही दिवसात दिशा सालियन फाईल्स हा चित्रपटही ओटीटीवर येणार आहे, अशी माहिती भाजपचे नेते नितेश राणे यांनी दिली आहे. दिशा सालियन प्रकरणात नितेश राणे यांनी वेळोवेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे दिशा सालियनवर खरोखरच सिनेमा येणार आहे का? येणार असेल तर त्यात कुणावर आरोप केलेत? या सिनेमामुळे कोण गोत्यात येणार? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या विधानांचा समाचार घेतला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. मुंबईत तोडण्याचा डाव गुजरातमधून शिजतोय असं विधान राऊत यांनी केलं होतं. त्याचाही नितेश राणे यांनी समाचार घेतला आहे. आता तुम्हाला शाह आडनावाची अ‍ॅलर्जी वाटतेय. तर गुजराती बंधूंचा पैसा कसा चालतो तुम्हाला?

हे सुद्धा वाचा

तुमचा मालक बाहेरगावी जातो तिकडचा खर्च कोणाचा असतो? एक पैसाही उद्धव ठाकरेंच्या खिशातला जात नाही. यांचा सगळा खर्च हे उद्योगपती करत असतात. ते कसं चालतं? तेव्हा हे गुजराती महाराष्ट्रापासून मुंबई तोडणार आहेत असं वाटत नाही का? असा सवाल करतानाच राजकारणासाठी द्वेष पसरवणं बंद करा, असा इशाराच नितेश राणे यांनी दिला.

आमची सकाळ खराब केली असती का?

संविधान धोक्यात आहे असे संजय राऊत म्हणाले. संविधान धोक्यात असतं तर तुमच्या सारख्या कार्ट्याने रोज सकाळी 9 वाजता येऊन आमची सकाळ खराब केली असती का? संविधान पाळत असते तर आमच्या हिंदूंवर अत्याचार झाला नसता. रझा अकॅडमीचे लाड हे लोक करत बसले नसते. तुम्ही संविधानला मानत नाही आहात हे आम्हाला माहिती आहे. पंतप्रधानांनी टीका करणाऱ्यांची जी यादी सांगितली ते सामान्य लोक नव्हते तर ते काँग्रेसचे लोक होते, असं राणे म्हणाले.

राऊत उत्तर द्या

काल रात्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हुतात्मा स्मारकावर गेले होते. त्यामुळे गोमूत्राने हुतात्मा स्मारकाचे शुद्धीकरण केले पाहिजे, असं ते म्हणाले. काल मी तेजस आणि आदित्यबद्दल बोललो. त्याचे उत्तर दया संजय राऊत, असं आव्हानच त्यांनी दिलं.

राऊत शकुनी मामा

यांना इथे शरीया कायदा लागू करायचा आहे. उद्धव ठाकरे आणि या सर्वांचे धर्मांतर झाले आहे. 2019 ला यांना खुर्ची देताना यांचा सुंता करून टाकला आहे. धर्मांतर करून टाकलं आहे. संजय राऊत हा महाभारतातला शकुनीमामा आहे. उद्या उद्धव ठाकरेंच्या घरात भांडणे झाली तर त्याला जबाबदार संजय राऊतच असणार हे आताच उद्धवजींना सांगून ठेवतो, असं ते म्हणाले.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.