Pandharpur Unlock : 5 तालुक्यातील संचारबंदी आजपासून शिथील, कोणकोणत्या तालुक्यांचा समावेश?
पंढरपूरसह माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला या तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढू लागले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 13 ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर दहा दिवसांनी निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे.
सोलापूर : पंढरपूरसह पाच तालुक्यातील संचारबंदी आजपासून शिथील करण्यात येत आहे. पंढरपूरसह ,करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला या पाच तालुक्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. या तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून हा निर्णय घेतला होता. पण दहा दिवसानंतर आता निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात येत आहे.
पंढरपूरसह माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला या तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढू लागले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 13 ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर दहा दिवसांनी निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी सोलापूर यांनी आजपासून पुन्हा या पाच तालुक्यात संचारबंदी शिथील केली. दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहतील. त्यामुळे व्यापाऱ्याने समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वी प्रशासनाकडून संचारबंदी लागू केल्यानेपंढरपुरातील व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. पंढरपूर शहरात संचारबंदी लागू झाल्यापासून सकाळच्या सुमारास पंढरपुरातील भादुले चौक, स्टेशन रोड, शिवाजी चौक यासह शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद होती, त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत होता.
संचारबंदीतही पंढरपूर भाविकांनी भरलं
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहरामध्ये संचारबंदी लागू केली होती. मात्र एस टी आणि खासगी सेवा सुरु असल्याने अनेक भाविक पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येत होते. त्यामुळे संचार बंदी असतानाही पंढरपूर भाविकांनी फुलले होते.
तिसऱ्या श्रावणी सोमवारी विठूरायाची मनमोहक पूजा
आज तिसरा श्रावणी सोमवार असल्याने राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी असणाऱ्या पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. ही सजावट मुंबई येथील विठ्ठल भक्त शशिकांत मढवी यांनी केलीय. श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा सोळखांबी, चारखांबी तसेच मंदिराच्या विविध भागांना गुलछडी, गुलाब, शेवंती, ग्लेंडर, निळ्या रंगाचा ब्ल्यू डीजे, पिवळा झेंडु , कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस, ड्रेसिना, औरकेड अशा विविध आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. यासाठी जवळपास एक टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे.
VIDEO : विठूरायाची आजची पूजा
संबंधित बातम्या
पंढरपुरात कडक निर्बंध, मात्र पुत्रदा एकादशी निमित्त तब्बल 50000 भाविक विठ्ठल दर्शनासाठी दाखल
Pandharpur | श्रावणी सोमवारनिमित्त विठ्ठल, रुक्मिणीच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट