ज्यांनी एक वीटही रचली नाही त्यांनी उद्घाटन केलं; देवेंद्र फडणवीस यांचा टोला
रिफायनरी प्रोजेक्त आम्ही आता राज्यातचं आणणार आहोत. या प्रोजेक्टमुळं महाराष्ट्राची पुढची २० वर्षांची वाटचाल आमची अर्थव्यवस्था सुदृढ होणार असल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
सिंधुदुर्ग : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारनं अडीच वर्षात कोकणासाठी काही केलं नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला. आंगणेवाडी येथील सभेत फडणवीस बोलत होते. काही लोकांना दोनवेळा उद्धाटन करण्याचा शौक असल्याची टीकाही त्यावेळी त्यांनी केली. तसेच त्यांनी चिपी विमानतळावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला. चिपी विमानतळाचं श्रेय नारायण राणे यांचंच आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. वादळावेळी ठाकरे सरकारने कोकणाला मदत केली नाही. महाविकास आघाडीचे कोकणावरील प्रेम बेगडी होतं, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
ज्यांनी एक वीटही रचली नाही त्यांनी उद्घाटन केलं, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना हा टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या सरकारनं चांदा ते बांधाच्या योजनेला आपण मोठ्या प्रमाणात निधी दिला. रस्ते, मुलभूत सोयी याकरिता निधी दिला. काजू, नारळ, सुपारी, यासंदर्भातील विविध योजना त्या काळात आणल्या. पण, यासारखी एकही चांगली योजना उद्धव ठाकरे यांच्या सरकारला आणता आली नाही.
सर्वात मोठी गुंतवणूक होणार होती
कोकणाचं काय नुकसान केलं हे लक्षात घेतलं तर रिफायनरीचा प्रोजेक्स हा आतापर्यंत तयार झाला असता. ही ग्रीन रिफायनरी होती. देशाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी गुंतवणूक कधीही झाली नाही, एवढी मोठी गुंतवणूक होणार होती.
एक लाख रोजगार मिळणार होता
तीन लाख कोटींची गुंतवणूक होणार होती. तीन सरकारी कंपन्या ही गुंतवणूक करणार होते. एक लाख लोकांना त्याठिकाणी रोजगार मिळणार होता. खोटं सांगून लोकांना फसविलं. रिफायनरी झाली तर आंबे येणार नाहीत, असं खोटं सांगितल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
जामनगर येथील रिफायनरीच्या परिसरातून आंब्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मासेमारी समाजाला सांगितलं तुमचे मासे होणार नाही. खोट बोलून याठिकाणी एका चांगल्या प्रोजेक्टला विरोध केला. आपलं सरकार आलं नसतं तर केंद्र सरकारनं हा प्रोजेक्ट तीन राज्यात नेण्याचा निर्णय घेतला होता.
२० वर्षांची वाटचाल सुदृढ होणार
केरळ, कर्नाटक, गुजरात राज्यात हा प्रकल्प गेला असता.रिफायनरी प्रोजेक्त आम्ही आता राज्यातचं आणणार आहोत. या प्रोजेक्टमुळं महाराष्ट्राची पुढची २० वर्षांची वाटचाल आमची अर्थव्यवस्था सुदृढ होणार असल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.