कुपोषित बालके शोधण्यासाठी स्पेशल ड्राईव्ह, ‘नंदूरबार पॅटर्न’ आता राज्यात राबविला जाणार

कुपोषित बालकांचं प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठीचा नंदूरबार पॅटर्न आता राज्यात राबविला जाणार आहे.

कुपोषित बालके शोधण्यासाठी स्पेशल ड्राईव्ह, 'नंदूरबार पॅटर्न' आता राज्यात राबविला जाणार
कुपोषित बालकांचं प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठीचा नंदूरबार पॅटर्न आता राज्यात राबविला जाणार आहे.
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 12:16 PM

नंदूरबार : कुपोषित बालकांचं प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठीचा नंदूरबार पॅटर्न आता राज्यात राबविला जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी युनिसेफ महिला बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या वतीने वर्षातून दोन वेळा बालकांची तपासणी करण्यात येत असते. आता हाच तपासणी पॅटर्न राज्यात राबविला जाणार आहे.

नंदूरबार पॅटर्न आता राज्यात राबविला जाणार

जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी युनिसेफ महिला बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून कुपोषित बालकांचा शोध घेतला जात असतो. आता 15 ऑगस्टपासून ही पद्धत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.

शोध-मोहिमेमुळे कुपोषित बालकांची संख्या जास्त पण बालमृत्यू रोखण्यासाठी चांगली मोहिम

यावर्षी जून महिन्यात करण्यात आलेल्या शोधमोहिमेत 3 हजार 224 अति तीव्र कुपोषित आणि 17519 मध्यम कुपोषित बालके आढळून आली होती. या बालकांवर उपचार बालग्राम केंद्र आणि पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये सुरु आहे. या शोध मोहिमेमुळे कुपोषित बालकांची संख्या जास्त दिसत असली तरी बालकांवर उपचार करण्यासाठी आणि बालमृत्यू रोखण्यासाठी ही मोहीम चांगली आहे.यातून कुपोषणाची खरी आकडेवारी समोर येत आहे.

कुपोषित बालके शोधण्यासाठी स्पेशल ड्राईव्ह

त्यामुळे राज्यातील इतरही जिल्ह्यात नंदुरबार प्रमाणे कुपोषित बालके शोधण्यासाठी स्पेशल ड्राईव्ह घेतला जाणार आहे . महिला बालकल्याण विभागाच्यावतीने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे या संदर्भातली माहिती घेण्यात आली असून येत्या 15 ऑगस्ट पासून राज्यभर कुपोषित बालकांची शोधमोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

(Special drive to find malnourished children, Nandurbar pattern will now be implemented in the state)

हे ही वाचा :

सरकारच्या भरमसाठ योजना पण मेळघाटातील कुपोषण थांबेना, 3 महिन्यातील धक्कादायक आकडेवारी समोर

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.