नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा खास उपक्रम, महिला अधिकारी देणार प्रशिक्षण!
नंदुरबार जिल्हाच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या संकल्पनेतून कुपोषण कमी करण्यासाठी कमी खर्चात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. विषेश म्हणजे या मोहिमेची फायदेही दिसून येत आहेत. बालकांच्या वजनात मोठा फरक दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील सर्वच महिला अधिकारी व कर्मचारी 5 मातांना प्रशिक्षणासाठी दत्तक घेतले जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी सांगितले आहे.
नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने मोठ्या प्रमाणात तिथे कुपोषणाचा प्रश्न आहे. कुपोषणचा विषय जेव्हा निघतो त्यावेळी नंदुरबारची आठवण सर्वात अगोदर होते. मध्यंतरी कुपोषितांना ठेकेदारांकडून पोषण आहार (Nutrition diet) मिळत नसल्यामुळे विषय चांगलाच गाजला होता आणि पोषण आहार नसल्यामुळे कुपोषणाचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच जात आहे. मात्र कुपोषण रोखण्यासाठी प्रशासन कुठेतरी अपयशी ठरत असल्याने आता कुपोषणाविरोधातील मैदानात जिल्हाधिकारीच उतरल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी महिला असल्यामुळे त्यांनी स्वतः अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण (Training) देण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हा प्रशासन आणि टाटा सोशलचा पुढाकार
बाळाच्या जन्मानंतर वर्षभर होणारी त्याची वाढ त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. यामध्ये प्रमुख म्हणजे आईचे दूध हे महत्वाचे आहे. मात्र, ग्रामीण भागात आईला योग्य पद्धतीने आपल्या बाळांना फीडिंग करता येत नसल्याचे बाळांच्या वजनामध्ये योग्य रीतीने वाढ होत नाही. याचाच परिणाम म्हणजे कुपोषणाचे प्रमाण वाढत असल्याने नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि टाटा सोशल सायन्स यांच्या माध्यमातून योग्य फीडिंगसाठी डॉक्टर नर्स आणि आशा सेविकांना प्रशिक्षण दिले जात आहे.
महिला अधिकारी 5 मातांना प्रशिक्षणासाठी घेणार दत्तक
नंदुरबार जिल्हाच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या संकल्पनेतून कुपोषण कमी करण्यासाठी कमी खर्चात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेचे फायदेही दिसून येत आहेत. बालकांच्या वजनात मोठा फरक दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील सर्वच महिला अधिकारी व कर्मचारी 5 मातांना प्रशिक्षणासाठी दत्तक घेतले जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील काही जिल्हामधील कुपोषणाचा प्रश्न गंभीर होताना दिसतो आहे. जर नंदुरबारसारखे प्रशिक्षण सर्व जिल्हामध्ये राबवले तर काही अंशी तर कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.