Osmanabad Raid : उस्मानाबाद शहरातील अवैध धंद्यावर पोलिसांच्या धाडी, आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात बीड पोलिसांचे विशेष पथक दाखल

विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या आदेशाने विशेष पथकाची कारवाईला सुरुवात झाली असून यामुळे अवैध धंदे करणाऱ्या माफियाचे धाबे दणाणले आहे. उस्मानाबाद शहरात अवैध धंदे वाढल्याने व पोलिसांचे नियंत्रण नसल्याने बीड पोलिसांनी उस्मानाबाद येथे येऊन कारवाई केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Osmanabad Raid : उस्मानाबाद शहरातील अवैध धंद्यावर पोलिसांच्या धाडी, आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात बीड पोलिसांचे विशेष पथक दाखल
उस्मानाबाद शहरातील अवैध धंद्यावर पोलिसांच्या धाडीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 12:15 AM

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील अवैध धंद्यावर पोलिसांच्या धाडी (Raid) पडल्या असून पोलिसांची कारवाई सुरु आहे. अवैध लॉटरी, चक्री, जुगार व मटका बुकी अड्यावर विशेष पथका (Special Squad)ची उस्मानाबाद शहरात धाड पडली आहे. बीड पोलीस दलाचे विशेष पथकाची उस्मानाबाद शहरात अनेक ठिकाणी कारवाई सुरु आहे. या कारवाईत लाखो रुपये, कॅम्पुटर व एजन्ट यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. उस्मानाबाद शहर व आनंदनगर पोलीस ठाण्यात जवळपास 40 ते 50 जणांना ताब्यात (Detained) घेतले असून पोलीस चौकशी व कारवाई सुरु आहे. बीड येथील पोलीस उपाधीक्षक आयपीएस दर्जाचे अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात बीड पोलिसांचे 25 जणांचे विशेष पथक करून झाले असून कारवाई सुरु आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या आदेशाने विशेष पथकाची कारवाईला सुरुवात झाली असून यामुळे अवैध धंदे करणाऱ्या माफियाचे धाबे दणाणले आहे. उस्मानाबाद शहरात अवैध धंदे वाढल्याने व पोलिसांचे नियंत्रण नसल्याने बीड पोलिसांनी उस्मानाबाद येथे येऊन कारवाई केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कुमावत यांच्यासारखे दबंग अधिकारी कारवाईसाठी आल्याने ठोस कारवाईची शक्यता आहे.

मोठे मासे गळाला लागणार का ?

उस्मानाबाद शहरात अवैध धंद्यावर छापा टाकणारे बीडचे पोलीस उपअधीक्षक पंकज कुमावत यांचा धसका अवैध धंदे करणाऱ्यांनी घेतला आहे. कारण त्यांच्या बीड येथील धडक कारवाईने राज्यभर खळबळ माजवली आहे. उस्मानाबाद येथे विशेष कारवाई करण्यासाठी त्यांना पाठविण्यात आल्याने ते नेमका काय अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक यांना देतात याकडे लक्ष लागले आहे. या कारवाईत काही दलाल एजंट यांना पकडण्यात आले असले तरी त्यांचे नेटवर्क चालविणाऱ्या म्होरक्यांना पोलीस पकडणार का ? यासह अन्य बाबींकडे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत पंकज कुमावत ?

कुमावत हे बीडचे पोलीस उप अधीक्षक असून ते आयपीएस अधिकारी आहेत. बीड येथील अवैध धंदे करणाऱ्याच्या त्यांनी कारवाई करून चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत. अवैध बायो डिझेल रॅकेट प्रकरणी त्यांनी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष कुंडलिक खाडे यांच्यावर कारवाई केल्याने त्यांना पक्षातून हकालपट्टी केली होती तर पत्याच्या क्लब व अवैध जुगार प्रकरणात त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावर कारवाई केली. बीड येथील वक्फ देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी नेमण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुख पदी कुमावत यांची निवड करण्यात आली आहे. दारू, जुगार, वाळू, बायो डिझेल यासह अनेक अवैध धंद्यावर त्यांनी स्वतः जाऊन छापा टाकल्याने त्यांची बीड जिल्ह्यात अवैध धंदेवाल्यात चांगलीच धास्ती आहे. बीड येथे रुजू झाल्यावर त्यांनी स्वतःचा नंबर सार्वजनिक करीत थेट तक्रार करण्याचे जनतेला आवाहन केले आणी त्यातून मिळणाऱ्या माहितीतून कारवाईचे सत्र राबविले. राजस्थानमधील झुंझुनूचे रहिवासी असलेले पंकज कुमावत हे 2014 साली आयआयटी मधील अभियांत्रिकीची पदवी धारक असून त्यांनी पहिल्या प्रयत्नात 2019 सालच्या परीक्षेत यश मिळविले त्यांना भारतीय पोलिस सेवेतील महाराष्ट्र केडर मिळाले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.