हे आमचं राजकीय संशोधन, अब्दुल सत्तार यांची फटकेबाजी, इथपर्यंत कसं पोहचलो हेही सांगितलं

मला अगोदर मराठी येत नव्हती. राजकारणात आल्यावर मी काय बोलायचो, ते लोकांना कळतं नव्हते. आता मला हिंदी नीट बोलता येत नाही.

हे आमचं राजकीय संशोधन, अब्दुल सत्तार यांची फटकेबाजी, इथपर्यंत कसं पोहचलो हेही सांगितलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 7:38 PM

मनोज गाडेकर, शिर्डी, अहमदनगर : राज्यातील कृषी विद्यापीठांनी विविध पिकांमध्ये संशोधन केले. नवनवीन वाण तयार केले आहेत. ही एक प्रकारे त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांची केलेली सेवा आहे. कृषी शास्त्रज्ञ हे शेतीचे खरे सैनिक असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती अब्दुल सत्तार यांनी केलंय. राहुरी कृषी विद्यापीठ येथे तीन दिवसीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची 51 वी बैठकीचे उद्घाटन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे हस्ते पार पडले. याप्रसंगी सत्तारांनी हे वक्तव्य केलंय.

शास्त्रज्ञ असो की संशोधक, घरचा मामला कंट्रोलवाला असला तर बाहेर बाहेर काम करू शकत नाही. माझ्या बायकोने सपोर्ट केल्यामुळे इथपर्यंत पोहचलो. आम्ही केलेली क्रांती आणि संशोधन कमी नाही. समोरच्या माणसाच्या पोटात, ओठात आणि बटन दाबणाऱ्या बोटात काय? याचंही संशोधन आम्ही करतो. हे आमचं राजकीय संशोधन आहे, असा आपल्या खास शैलीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाषणातून फटकेबाजी केली.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस नाव आलं की लफडं होतं. कुलगुरूंना लोकसभा, विधानसभा लढवायची नाही. कृषी विद्यापीठाच्या संदर्भात एका संस्थेच्या नावात काँग्रेस उल्लेख असल्याने सत्तार यांनी कुलगुरुंकडून माहिती जाणून घेतली.

राजकारणात आल्यावर मराठी शिकलो

मला अगोदर मराठी येत नव्हती. राजकारणात आल्यावर मी काय बोलायचो, ते लोकांना कळतं नव्हते. आता मला हिंदी नीट बोलता येत नाही. मराठी भाषेत संभाषण करायला खूप मजा येते. मात्र हिंदीला विरोध नाही, असही सत्तार म्हणाले.

महाराष्ट्रात मराठी बोलायला शिका

बाहेर राज्यातून येणाऱ्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या भूमीत मराठी बोलायला शिकावं. पुढच्यावेळी तुमचे भाषण मराठीत ऐकायला आवडेल, असंही सत्तार परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमनी यांना उद्देशून म्हणाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.