Ichalkaranji Crime : शाळेत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, संतप्त पालकांकडून शाळेवर दगडफेक

शाळेचे अध्यक्ष आणि प्राचार्यांनी अपमानास्पद वागणूक देत शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिल्याने मुलाने आत्महत्या केल्याची तक्रार त्याच्या आजोबांनी पोलिसात दिली. याच अनुषंगाने आज शाळेवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी शाळेवर दगडफेक केली. यावेळी ग्रामस्थ व पोलिसांमध्ये झटापट झाली.

Ichalkaranji Crime : शाळेत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, संतप्त पालकांकडून शाळेवर दगडफेक
इचलकरंजीत शाळेत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने विद्यार्थ्याची आत्महत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 5:39 PM

इचलकरंजी : नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेत अपमानास्पद वागणूक मिळाल्याने घरी गळफास लावून घेवून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी हातकणंगलेत घडली. यामुळे संतप्त पालकांनी आज मोर्चा काढून शाळेवर दगडफेक (Stone Pelted) करण्यात आली. याप्रकरणी शुक्रवारी राञी उशिरा शिरोली एमआयडीसी पोलिसात शाळेचे अध्यक्ष आणि प्राचार्या विरोधात गुन्हा दाखल झाला. हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथल्या एका इंटरनॅशनल स्कुलमध्ये मयत विद्यार्थी इयत्ता नववीत शिकत होता. (Stone pelted at school by angry parents over school student suicide in ichalkaranji)

शाळेतून घरी आल्यानंतर रुममध्ये जाऊन गळफास लावून घेतला

शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला होता. सायंकाळी शाळा सुटल्याने त्याला आजोबांनी घरी आणण्यासाठी शाळेत गेले होते. त्यावेळी आर्यन हा शाळेच्या कट्ट्यावर शांत बसला होता. तो फार नाराज दिसत होता. घरी जाण्यासही तयार नव्हता. मात्र आजोबांनी समजूत काढून त्याला घरी आणले. घरी आणल्यानंतर त्याने घरातील एका रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेतला. थोड्या वेळाने घरातील लोकांनी त्याला आवाज देत दरवाजा उघडण्यास सांगितले. पण आतून कोणताच प्रतिसाद येत नव्हता. यामुळे घरच्या लोकांनी कुऱ्हाडीच्या साहाय्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर आर्यनने गळफास लावून घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी शिरोली पोलिसांनी धाव घेवून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर कोल्हापूर येथे पाठवला.

शाळेत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने उचलले टोकाचे पाऊल

शाळेचे अध्यक्ष आणि प्राचार्यांनी अपमानास्पद वागणूक देत शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिल्याने मुलाने आत्महत्या केल्याची तक्रार त्याच्या आजोबांनी पोलिसात दिली. याच अनुषंगाने आज शाळेवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी शाळेवर दगडफेक केली. यावेळी ग्रामस्थ व पोलिसांमध्ये झटापट झाली. यामुळे गावामध्ये तणावाचे वातावरण बनले होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून आंदोलनकर्त्यांना शांत केले. (Stone pelted at school by angry parents over school student suicide in ichalkaranji)

इतर बातम्या

Kalyan Crime : कल्याण रेल्वे स्थानकात महिलेला मोबाईल हिसकावून पळणारे चोरटे गजाआड

Video : गोरखनाथ मंदिरात पीएसी जवानांवर हल्ला, हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...